
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 68.32 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवसभराच्या व्यवहारात हा स्टॉक 5.5 टक्क्यांच्या वाढीसह 71.98 रुपये किमतीवर पोहचला होता. 2024 या वर्षात आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 170 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला होता. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 78.15 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 24.95 रुपये होती. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी आयआरबी इन्फ्रा स्टॉक 4.12 टक्के वाढीसह 71.01 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
तज्ञांच्या मते, आयआरबी इन्फ्रा स्टॉकने मंगळवारी मजबूत ब्रेकआऊट दिला आहे. ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधरच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 84 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी गुंतवणुकदारांना हा स्टॉक खरेदी करताना 66 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच आयआरबी इन्फ्रा स्टॉकने आपली 66.50 रुपये ही 50 दिवसांची एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज पातळी ओलांडली आहे.
आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरबी इन्फ्रा स्टॉक महत्त्वपूर्ण ट्रेडिंग व्हॉल्यूमसह निर्णायक ब्रेकआउटचे प्रदर्शन करत आहे. सध्या हा स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे. हा स्टॉक आपल्या 20 दिवस आणि 50 दिवसांच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेजच्या जवळ आल्याने तेजीचे संकेत देत आहे.
शेअरचा दैनंदिन RSI देखील 50 च्या पार गेला आहे. त्यामुळे तज्ञांनी 70.5-71.5 रुपये दरम्यान दीर्घकालीन पोझिशन्ससाठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, शेअरची पुढील टारगेट प्राइस 78 रुपये असेल. यासाठी गुंतवणूकदारांनी 66 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.