6 May 2025 4:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

IREDA Share Price | IREDA शेअर ब्रेकआऊट देणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News

Highlights:

  • IREDA Share PriceNSE: IREDA – इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी अंश
  • शेअर उच्चांकी पातळीपासून 25 टक्क्यांनी खाली
  • कंपनीचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल
  • IREDA शेअर्सबद्दल तज्ञांचे मत काय आहे?
IREDA Share Price

IREDA Share Price | सरकारी IREDA कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांनी IREDA शेअर्सची (NSE: IREDA) मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने हा PSU स्टॉक पुन्हा फोकसमध्ये आला आहे. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3.61% टक्के वाढून 232.50 रुपयांवर बंद झाला होता. (इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी अंश)

शेअर उच्चांकी पातळीपासून 25 टक्क्यांनी खाली
IREDA कंपनीचा शेअर त्याच्या 52 आठवड्याच्या उच्चांकी पातळीपासून (310 रुपयांच्या) अजूनही 25 टक्क्यांनी खाली आहे. आजच्या तारखेपर्यंत कंपनीचे एकूण मार्केट कॅप 62,064 कोटी रुपये होते. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1.46 टक्के वाढून 234.50 रुपयांवर ट्रेड करत होता.

कंपनीचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल
सरकारी कंपनी IREDA आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल 10 ऑक्टोबर रोजी जाहीर करणार आहे अशी एक्सचेंजला फायलिंगमध्ये माहिती दिली आहे. BSE वरील उपलब्ध आकडेवारीनुसार, रिटेल गुंतवणूकदारांनी IREDA कंपनीत त्यांचा हिस्सा वाढवला आहे. रिटेल गुंतवणूकदारांनी सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस IREDA मध्ये 19.88 टक्के हिस्सा घेतला होता, तर जून तिमाहीच्या अखेरीस त्यांच्याकडे 18.59% हिस्सा होता असं आकडेवारी सांगते. म्युच्युअल फंडा हाऊसेसची IREDA कंपनीत 0.2% हिस्सा आहे. तर भारत सरकारकडे कंपनीची 75% हिस्सेदारी आहे.

IREDA शेअर्सबद्दल तज्ञांचे मत काय आहे?
प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म आनंद राठीचे विश्लेषक म्हणाले की, “IREDA शेअर ₹310 च्या उच्चांकावर पोहोचल्यापासून जवळपास 100 पॉइंट्सची तीव्र सुधारणा दिसून आली आहे. परिणामी, शेअरची किंमत सध्याच्या टप्प्यावर 33% ने कमी झाली आहे. या घटकांचा विचार करून, तज्ज्ञांनी २५० रुपयाच्या टार्गेट सह स्टॉप-लॉस ₹ 205 च्या आसपास ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price 10 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या