2 May 2024 5:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Titan Company Share Price | अनेकांना करोडपती करणारा टायटन शेअर, झुनझुनवालांचा फेवरेट स्टॉक पुढं तेजीत येतोय, कारण पाहा

Titan company Share Price

Titan Company Share Price | आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल कंपन्यांनी जाहीर करायला सुरुवात केली आहे. दरम्यान टाटा उद्योग समूहाची मालकी असलेल्या टायटन कंपनीनेही आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. सणासुदीच्या काळातील वाढलेल्या मागणीमुळे भारतातील प्रसिद्ध ज्वेलरी आणि घड्याळ निर्माता ‘टायटन’ कंपनीचा व्यवसाय वाढला आहे. स्टँडअलोन आधारावर डिसेंबर 2022 तिमाहीत टायटन कंपनीच्या व्यवसायात 12 टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती कंपनीने तिमाही निकालात दिली आहे. दुसरीकडे NSE इंडेक्सवर टायटन कंपनीचा शेअर सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी 2.40 टक्के घसरणीसह 2477.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Titan Company Share Price | Titan Company Stock Price | BSE 500114 | NSE TITAN)

आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीचा कालावधी पूर्ण झाला आहे. आणि Titan कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. यासह कंपनीने म्हटले आहे की, आमच्या सकारात्मक ग्राहक भावनांमुळे सर्व श्रेणींच्या उत्पादनामध्ये वार्षिक आधारावर दहा टक्के वाढ झाली आहे. टाटा उद्योग समूहाच्या मालकीच्या TITAN कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीत 111 नवीन स्टोअर लाँच केले होते. त्यामुळे आता संपूर्ण भारतात Titan कंपनीचे एकूण 2362 आउटलेट आहेत.

टायटन ज्वेलरी कंपनीने आपल्या समीक्षाधीन कालावधीत 11 टक्क्यांची भरघोस वार्षिक वाढ नोंदवली आहे. टायटन कंपनीच्या एकूण उत्पन्नात दागिन्यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा सामान्यतः दोन तृतीयांशपेक्षा अधिक आहे. टायटन कंपनी माहिती दिली आहे ली, सणासुदीच्या काळात Titan कंपनीचे उत्पादन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. उच्च मूल्याची खरेदी आणि नवीन आउटलेटमुळे ज्वेलरी विभाग वगळून इतर उत्पादनाच्या विक्रीत 11 टक्के वाढ पाहायला मिळली आहे.

टायटन कंपनीच्या जागतिक व्यापार धोरणानुसार टायटन कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये अमेरिकेतील न्यू जर्सी येथे तनिष्क ज्वेलरीचे पहिले आंतरराष्ट्रीय बुटीक स्टोअर लाँच केले आहे. USA मधील या नवीन इंटरनॅशनल स्टोअरसह, टायटन कंपनीची आंतरराष्ट्रीय उपस्थिती दुबई, अबू धाबी आणि अमेरिकेतील विविध शहरातील सहा शहरात आहे. भारतीय शेअर बाजारात बिग बूल म्हणून प्रसिद्ध दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांनी टायटन कंपनी शेअर्समध्ये खूप मोठी गुंतवणूक केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titan company Share Price 500114 in focus check details on 09 January 2023.

हॅशटॅग्स

#Titan Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x