 
						IREDA Share Price | शुक्रवार, 24 जानेवारी 2025 रोजी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअर 0.25 टक्क्यांनी घसरून 196.34 रुपयांवर पोहोचला होता. इरेडा लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप सध्या 52,747 कोटी रुपये आहे. इरेडा लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 310 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 121.05 रुपये होती.
5000 कोटी रुपयांचा निधी उभारण्यास मंजुरी
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 5000 कोटी रुपयांचा निधी उभारण्यास मंजुरी दिली आहे. इरेडा कंपनीच्या गुरुवार २३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. इरेडा कंपनी क्यूआयपीच्या माध्यमातून एक किंवा अधिक हप्त्यांमार्फत 5000 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे.
स्टॉक एक्स्चेंजला माहिती दिली
शुक्रवार, 24 जानेवारी 2025 रोजी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. गुरुवार २३ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या इरेडा कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीत क्यूआयपी बाबत निर्णय घेण्यात येईल, असे फायलिंगमध्ये म्हटले होते.
२०२४ मध्ये इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीला केंद्र सरकारकडून ४५०० कोटी रुपयांचा निधी उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. इरेडा कंपनीला नवीन इक्विटी जारी करून ४५०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याची मान्यता दिली होती.
इरेडा शेअर्सची कामगिरी
1 डिसेंबर 2023 रोजी इरेडा लिमिटेड कंपनी शेअर 62.75 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या इरेडा लिमिटेड कंपनी शेअर 195.88 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची गुरुवारची बंद किंमत 196.84 रुपये होती. शुक्रवारी दिवसभरात इरेडा लिमिटेड कंपनी शेअर 194.65 रुपये ते 198.37 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.
आनंद राठी ब्रोकरेज फर्म – इरेडा शेअरबाबत सल्ला
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी इरेडा कंपनी शेअर्सबाबत ‘वेट अँड वॉच’ सल्ला दिला आहे. आनंद राठी ब्रोकरेज फर्मचे मार्केट विश्लेषक जिगर एस पटेल म्हणाले की, ‘इरेडा कंपनी शेअर प्राईस २१० रुपयांच्या वर जाईल तेव्हाच नवीन गुंतवणुकीचा करावा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		