
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने 100 रुपये किंमत ओलांडली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 100 रुपये किमतीच्या पार गेले होते.
यासोबतच BEML, Rail Tel आणि IRCTC या रेल्वे कंपन्याचे शेअर्स देखील 3 टक्के ते 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते, IRFC स्टॉकमध्ये एक मजबूत ब्रेकआउट पाहायला मिळाला आहे. आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी IRFC स्टॉक 0.50 टक्के घसरणीसह 99.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
13 सप्टेंबर 2023 रोजी IRFC स्टॉकने आपली स्विंग हाय पातळी ओलांडली होती. मागील काही दिवसांत या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. तज्ञांच्या मते, IRFC कंपनीचे शेअर्स पुढील काळात 105 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. IRFC कंपनीच्या शेअर्सने दोन दिवस पूर्वी एक मजबूत ब्रेकआउट दिला होता. म्हणजेच IRFC कंपनीचे शेअर्स पुढील काळात 105 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी घसरणीमध्ये IRFC स्टॉक खरेदी करावा. या स्टॉकवर तज्ञांनी अल्पकालीन टार्गेट प्राइस म्हणून 106 रुपये किंमत निश्चित केली आहे. गुंतवणूकदारांना तज्ञांनी स्टॉक पैसे लावताना 94 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRFC कंपनीचे शेअर्स 6.09 टक्क्यांच्या वाढीसह 100.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील एका आठवड्यात IRFC कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 20.53 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 30.17 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.
मागील एका वर्षात IRFC कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 204.72 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 101.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 25.40 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.