
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 260 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 750 टक्के वाढली होती. बुधवारी आयआरएफसी स्टॉक 2.30 टक्क्यांच्या वाढीसह 180.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( आयआरएफसी कंपनी अंश )
या कंपनीचे शेअर्स 15 जुलै रोजी 229.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 15 टक्के घसरला आहे. शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.73 टक्के घसरणीसह 179.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या आयआरएफसी स्टॉक आपल्या 20 दिवस आणि 50 दिवसाच्या EMA पातळीच्या खाली ट्रेड करत आहे. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉकने 170 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.
तज्ञांच्या मते, जर हा स्टॉक 195 रुपये किमतीच्या वर टिकला तर शेअरची किंमत आणखी वाढू शकते. तज्ञांनी आयआरएफसी स्टॉक खरेदी करताना 170 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मेहता इक्विटी फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने 165 रुपये किमतीवर सपोर्ट निर्माण केला आहे. तसेच या स्टॉकला 190-200 रुपये दरम्यान रेझिस्टन्स मिळत आहे.
नुकताच आयआरएफसी कंपनीने आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या स्टॉकवर 7 टक्के म्हणजेच 0.70 पैसे अंतिम लाभांश वाटप करण्यासाठी 19 ऑगस्ट हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता. आयआरएफसी ही मिनीरत्न दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे, जी रेल्वे मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कामकाज करते. ही कंपनी भारतीय रेल्वेला भाडेतत्त्वावर मालमत्ता संपादन करण्यासाठी वित्तपुरवठा करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.