 
						IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच IRFC लिमिटेड या कंपनीचा IPO 2021 मध्ये लाँच झाला होता. हा आयपीओ 26 रुपये प्रति शेअर या किमतीवर लॉन्च करण्यात आला होता. सर्व IPO प्रमाणे हा IPO देखील सुरूवातील तेजीत धावला मात्र नंतर विक्रीच्या दबावाखाली किंचित घसरला. आता पुन्हा एकदा हा स्टॉक तेजीत आला आहे.
2023 च्या सुरुवातीपासून इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. मार्च 2023 पर्यंत हा स्टॉक 22-25 रुपये दरम्यान ट्रेड करत होता. नंतर अवघ्या चार महिन्यांत हा स्टॉक तेजीत आला आणि शेअरची किंमत 75 टक्क्यांनी वाढली. आज मंगळवार दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के वाढीसह 50.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
27 जुलै 2023 पासून इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील सात ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन स्टॉक तब्बल 30 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 12 टक्के वाढला होता. गुरुवारी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणत ब्लॉक डील पाहायला मिळाल्या होत्या. काही डील 1 कोटींपेक्षा जास्त शेअर्सची होती.
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन ही कंपनी भारतीय रेल्वेच्या म्हणजेच भारत सरकारच्या मालकीची आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी आपल्या 2023-24 च्या जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. यासाठी कंपनीने 11 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे.
IRFC कंपनीने नुकताच RITES Limited कंपनीसह रेल्वे संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा आणि विकासामध्ये सहकार्य मजबूत करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. रेल्वे प्रकल्पांसंबधित वित्त परिसंस्थेला आर्थिकरित्या मजबूत करण्यासह हा सामंजस्य करार भारतीय रेल्वेच्या सर्वांगीण विकास आणि आधुनिकीकरणामध्ये मोठा योगदान देणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		