
IRFC Vs RNVL Share | भारतीय शेअर बाजारात कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. मात्र नंतर गुंतवणूकदारांनी मजबूत नफा वसुली केली, आणि बाजार लाल निशाणीवर क्लोज झाला होता. आज मात्र शेअर बाजारात काही उलाढाल पाहायला मिळत नाहीये.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Railtel कंपनीचे शेअर्स 6.60 टक्के घसरणीसह 231.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि रेल विकास निगम स्टॉक देखील 10 टक्क्यांच्या घसरणीसह 170.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 5.25 टक्क्यांच्या घसरणीसह 80.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आज बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 4.24 टक्के घसरणीसह 162.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर आज IRFC कंपनीचे शेअर्स 6.70 टक्के घसरणीसह 77.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. IRFC कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 144 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 252 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात रेल विकास निगम कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 409 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. सोवरच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने 199.25 रुपये किंमत स्पर्श केली होती. मात्र नंतर स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणत नफा वसुली सुरू झाल्याने शेअर पुन्हा खाली आला आहे. शेअर बाजारातील या तेजी मंदीत टेक्समको रेल कंपनीचे शेअर्स 14 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. तर टिटागड रेल सिस्टीम स्टॉक 10 टक्के घसरला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.