
JITF Share Price | JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळत आहे. मागील 6 महिन्यात JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअरची किंमत 332.51 टक्के वाढली आहे. म्हणजेच या कालावधीत ज्या लोकांनी स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 401000 रुपये झाले आहे. (JITF Infra Share Price)
मागील एका महिन्यात 187.78 टक्के परतावा दिला
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 187.78 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 6575.99 टक्के नफा कमावून दिला आहे. 22 जून 2020 रोजी JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स कंपनीचे शेअर्स 6.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 445.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
3 वर्षांत 1 लाख रुपये गुंतवणुकीवर दिला 66 लाख रुपये परतावा
ज्या लोकांनी तीन वर्षांपूर्वी JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 66 लाखापेक्षा जास्त झाले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमधे 423.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 5 दिवसांत 21.52 टक्के परतावा दिला
मागील 5 दिवसांत JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स कंपनीचे शेअर्स 21.52 टक्के वाढले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 187.78 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीचे शेअर्स 301 टक्के मजबूत झाले आहेत.
मागील एका वर्षात शेअरने 265.54 टक्के परतावा दिला
मागील एका वर्षात JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअरने लोकांना 265.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 423.90 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 77.50 रुपये होती. JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स कंपनीला सलग चौथ्या तिमाहीत 20.08 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे.
या कंपनीच्या तिमाही महसुलात 28,95 टक्के आणि वार्षिक महसुलात 23.2 टक्के झालेली वाढ मागील 3 वर्षांच्या महसुलाच्या CAGR पेक्षा अधिक आहे. JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 63.02 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. यापैकी 3.86 टक्के शेअर्स कंपनीने मॉर्गेज ठेवले आहेत. परकीय गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 4.31 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 0.02 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी 32.64 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.