2 May 2024 12:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Polyplex Corporation Share Price | मोठी संधी! 11074% परतावा देणारा शेअर 40 टक्के स्वस्त झालाय, खरेदी करावा का?

Polyplex Corporation Share Price

Polyplex Corporation Share Price | शेअर बाजारात सध्या तिमाही निकाल आणि लाभांश वाटप करण्याचा सपाटा सुरू आहे. एकापाठोपाठ एक अनेक कंपन्यांनी आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आता लाभांश वाटप करणाऱ्या कंपनीच्या यादीत आणखी एका कंपनीचे नाव सामील झाले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड’. या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 30 रुपये प्रति इक्विटी शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Polyplex Corporation Share Price | Polyplex Corporation Stock Price | BSE 524051)

लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख :
‘पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला कळवले आहे की, ” कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक नुकताच पार पडली होती, ज्यात संचालकांनी दुसरा विशेष अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 30 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या लाभांश वाटपासाठी कंपनीने 24 फेब्रुवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. विशेष म्हणजे ही कंपनी T + 1 या सेटलमेंट श्रेणीमध्ये असल्याने एक्स डिव्हिडंड आणि रेकॉर्ड डेट एकाच दिवशी असेल.

शेअर बाजारात कंपनीची कामगिरी :
14 फेब्रुवारी 2023 रोजी ‘पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.96 टक्क्यांच्या घसरणीसह 1433.80 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील 1 महिन्यात ‘पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये 6.60 टक्क्यांपेक्षा अधिक पडझड पाहायला मिळाली आहे. ज्या लोकांनी सहा महिन्यांपूर्वी ‘पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना आता 40 टक्के नुकसान सहन करावे लागत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2870 रुपये होती. 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1419.65 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Polyplex Corporation Share Price 524051 stock market live on 15 February 2023.

हॅशटॅग्स

Polyplex Corporation Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x