 
						JP Power Share Price | बुधवारी भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. आज देखील स्टॉक मार्केटमध्ये अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रात जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. बँक निफ्टी इंडेक्स 51000 च्या खाली आला आहे. ( जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनी )
मात्र अशा काळात काही शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. स्मॉल-कॅप कंपनी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेडचे शेअर्स बुधवारी 5 टक्के वाढीसह 18.80 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स स्टॉक 2.13 टक्के वाढीसह 19.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जयप्रकाश पॉवर ही कंपनी मुख्यतः कोळसा खाण, वाळू उत्खनन, सिमेंट ग्राइंडिंग आणि थर्मल आणि जलविद्युत निर्मिती व्यवसायात गुंतलेली कंपनी आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12,884.50 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 215 टक्के परतावा कमावून दिला आहे. भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी एलआयसीने देखील या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.
जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, संचालक मंडळाची 147 वी बैठक शनिवार 27 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीदरम्यान कंपनीचे संचालक मंडळ जून तिमाहीचे अनऑडिटेड स्टँडअलोन आणि एकत्रित आर्थिक निकालांचे पुनरावलोकन करतील. तिमाही निकालांनुसार, जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीची कमाई 1515 कोटी रुपये होती.
मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीची कमाई 1380 कोटी रुपयेवरुन 9.78 टक्के वाढली आहे. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीचा ऑपरेटिंग नफा 727 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 227 कोटी रुपये ऑपरेटिंग नफा कमावला होता. या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 48 टक्के आहे.
मार्च 2024 तिमाहीत जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीने 589 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीला 44 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. FII ने जून 2024 तिमाहीत जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीतील आपला वाट 6.1 टक्केवरून वाढवून 7.6 टक्क्यांवर नेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		