3 May 2025 7:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Kalyan Jewellers India Share Price | सोनं नव्हे तर सोन्याच्या कंपनीचा शेअर आहे खास फायद्याचा, शेकडो टक्क्यांचा परतावा, शेअर चर्चेत आला

Kalyan Jewellers India Share Price

Kalyan Jewellers India Share Price | आज शेअर बाजारात ‘कल्याण ज्वेलर्स इंडिया’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. एकीकडे शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे ‘कल्याण ज्वेलर्स इंडिया’ कंपनीचे शेअर्स वाढत आहेत. ‘कल्याण ज्वेलर्स इंडिया’ कंपनीच्या शेअरच्या किमतीत काल कमालीची घसरण पाहायला मिळाली होती. या घसरणीचे प्रमुख कारण ब्लॉक डील असल्याचे मानले जात आहे. कंपनीतील एक दिग्गज गुंतवणूकदाराने आपली हिस्सेदारी कमी केली असल्याची माहिती मिळत आहे, मात्र शेअर हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.96 टक्के वाढीसह 109.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरमधील सध्याची हालचाल – What is the share price of Kalyan Jewellers?
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘कल्याण ज्वेलर्स इंडिया’ कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 9.25 टक्क्यांच्या घसरणीसह 109.50 रुपयांवर ट्रेड करत होते. NSE वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार काल 5 लाख 80 हजार शेअर्सची ब्लॉक डील झाली असून ते कंपनीच्या एकूण इक्विटीच्या 0.56 टक्के आहे. त्यामुळे काल शेअरमध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळत होता. आज मात्र स्टॉक किंचित वाढला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार ‘वॉरबर्ग पिंकस’ ची उपकंपनी असलेल्या ‘Hydel Investment’ ने ‘कल्याण ज्वेलर्स’ कंपनीमधील 2.5 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारात विकले आहेत. ‘Hydel Investment’ ही कंपनी ‘कल्याण ज्वेलर्स’ मधील महत्त्वपूर्ण शेअर धारक आहे. 31 डिसेंबर 2022 पर्यंतच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार ‘हायडल इन्व्हेस्टमेंट्स’ ने ‘कल्याण ज्वेलर्स इंडिया’ कंपनीतील एकूण 26.36 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

कल्याण ज्वेलर्स इंडिया शेअर्सची स्थिती (Is Kalyan Jewellers a Good Stock To Buy?)
2023 या वर्षात आतापर्यंत ‘कल्याण ज्वेलर्स इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये 16 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. या कालावधीत निफ्टी-50 इंडेक्स केवळ 7 टक्के कमजोर झाला आहे. ‘कल्याण ज्वेल्स’ कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 134.20 रुपये होती. ‘कल्याण ज्वेलर्स इंडिया’ ही कंपनी 26 मार्च 2021 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली होती. कंपनीच्या शेअरची इश्यू किंमत 87 रुपये होती.

कल्याण ज्वेलर्स शेअर प्राईस चार्ट (Kalyan Jewellers share price chart)

Chart

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kalyan Jewellers India Share Price on 29 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Kalyan Jewellers India Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या