 
						L&T Share Price | एल अँड टी या अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज शेअर बाजारात अस्थिरता असल्याने एल अँड टी स्टॉक देखील विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. ( एल अँड टी कंपनी अंश )
नुकताच एल अँड टी कंपनीला पश्चिम आशियामध्ये गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम मिळाले आहे. त्यामुळे गुरूवारी कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. आज शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी एल अँड टी स्टॉक 1.14 टक्के घसरणीसह 3,566.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एल अँड टी कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीला दोन नवीन पाइपलाइनचे अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम संबंधित काम मिळाले आहे. तसेच कंपनीला मिळालेल्या ऑर्डरमध्ये विद्यमान पाइपलाइन कॉरिडॉरशी इतर कमाचाही समावेश आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एल अँड टी कंपनीचे शेअर्स 3515.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर दिवसाअखेर हा स्टॉक 2.62 टक्क्यांच्या वाढीसह 3635.15 रुपये किमतीवर पोहोचला होता. एल अँड टी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 5 लाख कोटी रुपये आहे.
मागील एका वर्षभरात एल अँड टी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. एल अँड टी कंपनीला मिळालेला नवीन प्रोजेक्ट त्यांची उपकंपनी असलेल्या L & T Energy Hydrocarbon कंपनीने मिळवला आहे. कंपनीचे संचालक आणि वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष यांनी एका निवेदनात म्हंटले की, “हा कंपनीला मिळालेला आतपर्यंतचा सर्वात मोठा क्रॉस-कंट्री पाइपलाइन EPC प्रोजेक्ट आहे”. यामुळे कंपनीच्या व्यवसायात आणखी भर पडणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		