
LIC Share Price | एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1,300 रुपये किमतीवर जाऊ शकतो. एलआयसी स्टॉक टेक्निकल चार्टवर सकारात्मक वाढीचे संकेत आहे. तज्ञांच्या मते, शेअर बाजारातील अस्थिरता शांत होताच एलआयसी स्टॉक 1,300 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी एलआयसी कंपनीचे शेअर्स 1.50 टक्के वाढीसह 910.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( एलआयसी कंपनी अंश )
शेअर बाजारातील तज्ञांनी एलआयसी कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचा अंदाज व्यक्त करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या सरकारी विमा कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपासून 43 टक्के अधिक वाढू शकतात. मात्र सध्या एलआयसी स्टॉकची डाउनसाईड बॉटम लाईन निश्चितपणे सांगणे कठीण आहे. सध्या एलआयसी स्टॉक टेक्निकल चार्टवर टॉप-लोअर बॉटम पॅटर्न तयार करत आहे. जर शेअर बाजारातील विक्रीचा दबाव वाढला तर एलआयसी स्टॉक 800 रुपये किमतीपर्यंत घसरू शकतो.
एलआयसी कंपनीच्या शेअर्सची सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी 1,175 रुपये होती. सध्या हा स्टॉक आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीच्या 23 टक्के खाली ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स IPO मध्ये 949 रुपये इश्यू किमतीवर जारी करण्यात आले होते. आता शेअरची किंमत इश्यू किमतीच्या देखील खाली गेली आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने 530 रुपये ही नीचांक किंमत स्पर्श केली होती. या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत शेअर्सची किंमत 70 टक्के वाढली आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत एलआयसी कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 49 टक्के वाढीसह 9,444 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत एलआयसी कंपनीने 6,334 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.