
Loan Settlement | प्रत्येक व्यक्ती आपल्या गरजांनुसार वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज घेत असतो. यात लग्न, शिक्षण, घर, आजारपन अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा बॅंक आपल्याकडून आनेक अटी शर्तींवर स्वाक्षरी करून घेत असते. हे सर्व बॅंक स्वत: च्या सुरक्षीततेसाठी करते मात्र तरी देखील अनेक व्यक्ती त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीमुळे कर्जाचे ईएमआय वेळेवर भरण्यास असमर्थ ठरतात. तेव्हा बॅंक त्यावरील व्याज आणखीन वाढवते. मात्र यात कर्जापासून थोडा दिलासा मिळावा यासाठी काहींना सेटलमेंटचा पर्याय देखील मिळतो. मात्र या सेटलमेंटच्या फायद्याबरोबर तोटा देखील आहे. त्यामुळे तुम्हाला हा पर्याय मिळत असेल तर सावध रहा.
भारतीय रिझर्व्ह बॅंक सातत्याने रेपो दरात वाढ करत आहे. याचा थेट परिणाम कर्ज घेतलेल्या आणि नव्याने घेणा-या व्यक्तींच्या व्याजावर होत असतो. त्यामुळे देखील कर्जदारांना कर्ज भरता येत नाही. एखाद्या व्याक्तीने सलग तीन महिने कर्ज थकवले तर त्यावर बॅंक नोटीस पाठवत असते. नोटीस देउनही कर्जदार पैसे भरत नलेस तर त्याचे नाव थकित कर्जाच्या नॉन परफॉर्मिंग असेट (NPA) मध्ये टाकले जाते. बॅंक अशावेळी कर्जदाराच्या वस्तूवर लगेच जप्ती आणत नाही. सदर व्याक्ती कर्ज का फेडू शकत नाही याची कारणे जाणून घेतली जातात. त्यानंतर त्यांना सेटलमेंटचा पर्याय सुचवला जातो.
सेटलमेंटमध्ये नेमके काय होते
जेव्हा कर्जदार काही ठरावीक कारणांमुळे पिडीत असतो तेव्हा त्याला कर्ज फेडण्यास अडचणी येतात. यावेळी बॅंक ही सवलत देते. यात त्या व्यक्तीला मुद्दल एकरकमी भरायला सांगितली जाते. यात काही काळासाठी कर्जावर लागलेले व्याज देखील पूर्णत: रद्द केले जाते. त्यामुळे काही काळासाठी का होइना कर्जदाराला याचा फायदा होतो. डोक्यावर उभा असलेला कर्जाचा डोंगर कमी होतो.
अशा पध्दतीने सेटलमेंट केल्याने क्रेडीट स्कोअरवर याचा वाइट परिणाम होतो. यात आपल्याला थोडा दिलासा असला तरी, भविष्यात कर्जाची गरज भासल्यास बॅंक आपल्याला कर्ज देत नाही. यात सिबिल स्कोर देखील कमी होतो. पुढे ७ वर्षे हा स्कोर तेवढाच राहतो. यामध्ये सिबिल स्कोर पुर्ववत करण्यासाठी जेव्हा पैसे येतील तेव्हा व्याज भरून टाकावे. शक्यतो सेटलमेंटता पर्याय निवडू नये.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.