7 May 2024 10:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Interest Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यात EPF व्याजाचे पैसे जमा झाले का? पटापट तपासून घ्या, अपडेट आली ICICI Mutual Fund | पैसे गुंतवा आणि हमखास दुप्पट परतावा घ्या, ही म्युच्युअल फंड योजना आहे खास फायद्याची Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर देईल 45 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटलं पहा

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी इंडेक्सने नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. तज्ञांच्या मते, 2024 हे नवीन वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी आणखी चांगले ठरणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि शेअर बजार देखील तेजीत आहे, अशा काळात एका वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी बीईएमएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

2023 या वर्षात बीईएमएल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 82 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 2024 या वर्षात बीईएमएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 45 टक्के वाढू शकतात. शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी बीईएमएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.84 टक्के वाढीसह 2,795 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

2024 या नवीन वर्षात तज्ञांनी बीईएमएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 4000 रुपये टारगेट किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बीईएमएल लिमिटेड ही कंपनी मुख्यतः रेल्वे, खाणकाम आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करते.

बीईएमएल लिमिटेड कंपनीचा 50 टक्के कमाईचा हिस्सा खाणकाम व्यवसायातून येतो. तर उर्वरित 50 टक्के कमाईचा हिस्सा रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रातील व्यवसायातून येतो. बीईएमएल लिमिटेड कंपनीने वंदे भारत ट्रेनच्या रेल्वे गाड्या पुरवण्याचे देखील कंत्राट घेतले आहे. पुढील वर्षी बीईएमएल लिमिटेड कंपनीच्या कमाईत 40-50 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.

2023 या वर्षात बीईएमएल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 82 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत बीईएमएल लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 72 टक्के वाढली आहे. तर मागील 1 वर्षात या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 100 टक्के परतावा कमावला आहे. 22 डिसेंबर 2023 रोजी बीईएमएल लिमिटेड या डिफेन्स कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले आहेत. बीईएमएल लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 11,528 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy call on BEML Share Price 23 December 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(282)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x