12 May 2024 4:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Polycab Share Price | अल्पावधीत 400 टक्के परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर घसरून स्वस्त झाला, विकत घ्यावा?

Polycab Share Price

Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया या वायर आणि केबल्स उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड पडझड पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पॉलीकॅब इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या घसरणीसह 5638.65 रुपये किमतीवर पडले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, प्राप्तिकर विभागाने भारतातील 50 विविध ठिकाणी पॉलीकॅब कंपनीची तपासणी केली आहे.

पॉलीकॅब कंपनीशी संबंधित उच्च अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवरही आयकर विभागाने धाड मारली आहे. मीडिया रिपोर्टनुसार आयकर विभागाच्या छाप्यामागचे खरेदी कारण अद्याप समोर आलेले नाही. शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी पॉलीकॅब इंडिया स्टॉक 4.56 टक्के घसरणीसह 5,362.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

भारतीय स्टॉक एक्सचेंज निरीक्षक सेबीने पॉलीकॅब इंडिया कंपनीकडून आयकर विभागाच्या छाप्याबाबत माहिती मागवली आहे. मीडिया रिपोर्टनुसार आयकर विभागाच्या तपास शाखेने शुक्रवारी मुंबईत पॉलीकॅब इंडिया कंपनीशी संबंधित विविध 50 ठिकाणी छापा टाकला होता.

पॉलीकॅब इंडिया ही कंपनी मुख्यतः केबल्स आणि वायर्स, फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिक गुड्सचे उत्पादन आणि विक्री संबंधित व्यवसाय करते. पॉलीकॅब इंडिया कंपनीचे जवळपास 25 उत्पादन केंद्र गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड, तामिळनाडू आणि दमण याठिकाणी आहे.

मागील 3 वर्षात पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. 24 डिसेंबर 2020 रोजी पॉलीकॅब इंडिया कंपनीचे शेअर्स 1056.15 रुपये किमतीवर ट्रेड कर होते. तर 22 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5638.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका वर्षात पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 113 टक्के परतावा कमावून दिला आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी पॉलीकॅब इंडिया स्टॉक 2512.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 56 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 5722.90 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2500.15 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Polycab Share Price NSE 23 December 2023.

हॅशटॅग्स

Polycab Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x