2 May 2025 8:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Minor PPF Scheme | घरातील लहान मुलांच्या नावाने PPF खाते उघडून गुंतवणूक करा, त्याचे मोठे आर्थिक फायदे समजून घ्या

Minor PPF Scheme

Minor PPF Scheme| भारतीय नागरिकांना दीर्घकालीन बचत आणि गुंतवणुकीचा लाभ घेता यावा यासाठी भारत सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही दीर्घकालीन गुंतवणुक योजना सुरू केली आहे. पीपीएफ योजनेमध्ये गुंतवणुक करण्याचा मुख्य लाभ म्हणजे त्यावर मिळणारे चक्रवाढ व्याज आणि गुंतवलेल्या पैशावर मिळणारी आय सवलत.

फक्त भारतीय नागरिकांसाठी :
भारत सरकारच्या PPF योजनेत फक्त भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतात. प्रत्येक पात्र भारतीय नागरिक निर्धारित नियमांनुसार PPF खाते उघडू शकतो, आणि त्यात गुंतवणूक करू शकतो. अल्पवयीन मुलाचे पालक म्हणून, तुझी तुमच्या मुलासाठी पीपीएफ खाते उघडून त्यात गुंतवणूक करू शकता. मुलाच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी बचत करून तुम्ही चांगला परतावा कमवू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला तुमच्या मुलाच्या नावाने PPF खाते उघडून लाभ कसा मिळवायचा या संबंधित संपूर्ण माहिती घेऊ.

PPF योजनेबद्दल थोडक्यात :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीला PPF योजना म्हणूनही ओळखले जाते. PPF एक लॉग टर्म गॅरंटीड इन्कम सेव्हिंग स्कीम असून भारत सरकारद्वारे संचालित केली जाते. ही योजना फक्त भारतीय नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर लाभांव्यतिरिक्त निश्चित आणि हमखास परतावा मिळेल. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत या योजनेत कर सवलत मिळते. पीपीएफ खाते मुदतीपूर्वी बंद करता येत नाही. हे केवळ विशिष्ट कारणास्तव बंद केले जाऊ शकते. पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी किमान 15 वर्षे असतो. पाच वर्षानंतर ठेवीदार गरज असल्यास त्यांचे काही पैसे काढू शकतो. ही रक्कम एकूण गुंतवणुकीच्या 50 टक्क्यांपर्यंत असू शकते. भारतीय लोकांना बचत करून हमखास परतावा आणि आयकर सवलत मिळवता यावा यासाठी ही पीपीएफ योजना तयार करण्यात आली होती.

अल्पवयीन मुलांचे खाते उघडण्यासाठी पात्रता :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये फक्त भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतात, करमुक्त परतावा कमवू शकतात. केवळ पालकच आपल्या अल्पवयीन मुलांसाठी पीपीएफ खाते उघडून गुंतवणूक करू शकतात. एखाद्या नैसर्गिक किंवा कायदेशीर पालकाला आपल्या अल्पवयीन मुलाच्या वतीने पीपीएफ खात्याचे व्यवस्थापन करावे लागेल. अल्पवयीन मुलाचे आजी आजोबा किंवा इतर कोणी नातेवाईक मुलांच्या पीपीएफ खात्याचे व्यवस्थापन करू शकत नाहीत. ही सुविधा काही विशेष परिस्तिथीत दिली जाईल. एखाद्या नातेवाईकला मुलांचे PPF खाते व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना कायदेशीर पालक म्हणून नियुक्त करावे लागेल. पीपीएफ खाते उघडून गुंतवणूक करण्यासाठी नॉमिनीची माहिती देणे आवश्यक असते. किमान 500 रुपये वार्षिक जमा करून या योजनेत गुंतवणूक करता येते. वार्षिक आधारावर अल्पवयीन मुलांच्या नावाने PPF खात्यात कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येतील.

आवश्यक कागदपत्रे :
* अल्पवयीन मुलाचे पालक किंवा कायदेशीर पालक यांना संपूर्ण तपशीलासह PPF फॉर्म भरावा लागेल.
* PPF खाते उघडण्यासाठी पालकाचे KYC कागदपत्रे फोटोसह सादर करणे आवश्यक आहे.
* अल्पवयीन मुलासाठी वय पडताळणी कागदपत्र म्हणून आधार कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र सादर करावा लागेल.
* किमान 500 रुपयेचा धनादेश देऊन किमान गुंतवणूक करावी लागेल. प्रारंभिक पीपीएफ खाते योगदान म्हणून 500 रुपये जमा करणे आवश्यक असतात.
* PPF खात्यात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलांच्या सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी पैसे बचत करु शकता. ही एक अतिशय फायदेशीर योजना मानली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Minor PPF Scheme benefits and Investment opportunities for long term return on 20 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Minor PPF Scheme(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या