 
						Multibagger Stocks | मागील काही महिन्यांपासून शेअर बाजार जबरदस्त चढ उताराचा तोंड देत आहे. मागील आठवडा शेअर बाजारासाठी किंचित चांगला गेला असला तरी. गेल्या एका महिन्यात सेन्सेक्स इंडेक्स 697.93 अंकांनी म्हणजेच 1.15 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. तर निफ्टी-50 इंडेक्स 170.25 अंकांनी म्हणजेच 0.96 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. शेअर असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांच्यावर या घसरणीचा परिणाम झाला नाही. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा शेअर्सची माहिती देणार आहोत, ज्यांनी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
सोमा टेक्सटाइल्स :
‘सोमा टेक्सटाइल’ ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 82.18 कोटी रुपये आहे. मागील एका महिन्यात हा कंपनीच्या शेअरने लोकांना 177.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या शेअरची किंमत 9.08 रुपयांवरून वाढून 28.20 रुपयांवर गेकी आहे. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.83 टक्के वाढीसह 28.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरने एका महिन्यात 149.56 टक्क्यांच्या परताव्यासह, गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 2.77 लाखांपेक्षा जास्त परतावा दिला आहे.
झवेरी क्रेडिट्स :
‘झवेरी क्रेडिट्स’ कंपनीने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 45.73 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचा शेअर 15.70 रुपयांवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअर्समधून 164.27 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 26.82 कोटी रुपये आहे. मागील एका महिन्यात या स्टॉकने लोकांना 151.82 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
इयंत्रा व्हेंचर्स :
या कंपनीच्या शेअरने अवघ्या एका महिन्यात लोकांना 128.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 140.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स 53.05 रुपयांवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 18.30 कोटी रुपये आहे.
TaylorMade Renewable:
TaylorMade Renewable कंपनीच्या शेअरने मागील एका आपल्या गुंतवणूकदारांना 119.74 टक्के परतावा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 189.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. हा स्टॉक 74.40 रुपयांवरून वाढून सध्याच्या किमतीवर आला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 168.64 कोटी रुपये आहे.
नेटलिंक्स लिमिटेड :
या कंपनीच्या शेअरनेही मागील एका महिन्यात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.05 टक्के वाढीसह 62.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कालावधीत शेअरची किंमत 103.20 रुपयांवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचली आहे. मागील एका महिन्यात या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 29.48 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 14.14 कोटी रुपये आहे.
या शेअर ने ही जबरदस्त परतावा दिला :
मागील एका महिन्यात या शेअरने 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्यात सॉफ्टट्रॅक व्हेंचर्स कंपनीच्या शेअरने लोकांना 114.06 टक्के परतावा दिला आहे. तर फ्युचरिस्टिक सिक्युरिटीज कंपनीच्या शेअरने लोकांना 107.11 टक्के परतावा दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		