
Multibagger Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणुकदार पैसे खरेदी-विक्री करून नाही, तर दीर्घकाळ स्टॉक होल्ड करून कमवत असतात. असे काही शेअर्स असतात, जे गुंतवणूकदारांचे पैसे झटपट दुप्पट करतात. असाच एक स्टॉक बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीचा.
अवघ्या एका महिन्यात बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. आज बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ स्टॉक 4.15 टक्के वाढीसह 298 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीचा IPO 1 सप्टेंबर 2023 रोजी शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 92 ते 97 रुपये निश्चित केली होती. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीचे शेअर्स 304.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
ज्या गुंतवणूकदारांनी बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ IPO मध्ये पैसे गुंतवले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 215 टक्क्यांनी वाढले आहेत. बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 1200 शेअर्स ठेवले होते. एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांना किमान 1.16 लाख रुपये जमा करावे लागले होते. ज्या लोकांना या कंपनीचे शेअर्स वाटप केले गेले, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 215 टक्के वाढून 3.50 लाख रुपये झाले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.