3 May 2025 10:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Multibagger Stocks | घसरत्या बाजारात हा शेअर वाढत आहे, 2 वर्षांत दिला 18 पट परतावा, या शेअर मध्ये तेजी कायम राहणार?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप सेगमेंटमध्ये बऱ्याच कंपन्यानी आपल्या गुंतवणूकदारांना घसरत्या बाजारातही अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. अशीच एक कंपनी आहे, जिने अल्पावधीत आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. या कंपनीचे नाव आहे, “केर्नेक्स मायक्रोसिस्टम्स इंडिया”. ही कंपनी रेल्वे अपघात रोखण्यासाठी लागणाऱ्या सुरक्षा उपकरणांची निर्मिती करते. या कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालेली दिसून येते. 11 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअरमध्ये 5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, आणि शेअरची किंमत 344 रुपयांवर गेली होती. सध्याची हा स्टॉक आपल्या 15 वर्षांपूर्वीच्या किमतीवर ट्रेड करत आहे. यापूर्वी डिसेंबर 2005 मध्ये या कंपनीचा शेअर 363 रुपयेवर ट्रेड करत होता, जी त्यावेळची विक्रमी उच्चांकी किंमत होती. त्याचवेळी, मागील दोन वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.

गुंतवणूकदारांचे पैसे 18 पटीने वाढवले :
केर्नेक्स मायक्रोसिस्टम कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 18 पटीने अधिक वाढवले आहेत. 12 ऑक्टोबर 2020 रोजी हा शेअर 18.50 रुपयेवर ट्रेड करत होता, ज्यात कमालीची वाढ होऊन स्टॉक 18.59 पट वाढून 344 रुपये किमतीवर पोहोचला आहे. 11 ऑक्टोबर 2021 रोजी स्टॉक 78.60 रुपयांवर व्यवहार करत होता, जी त्याची एका वर्षांतील नीचांकी पातळी किंमत आहे. केर्नेक्स मायक्रो सिस्टम्स कंपनीने मागील महिन्यात स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कर्नेक्स-केईसी कन्सोर्टियमला उत्तर मध्य रेल्वेने 254.86 कोटी रुपयांच्या प्रकल्पाअंतर्गत स्वीकृती पत्र जारी केले आहे. या प्रकल्पात गाड्यांमधील टक्कर टाळण्यासाठी कवच निर्मिती करण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, कंपनी लवकरच 2019 मध्ये मान्य केलेला दक्षिण मध्य रेल्वेसोबतचा करार लवकरच पूर्ण करणार आहे.

भारतीय रेल्वे आपल्या सर्व गाड्यांसाठी एक सुरक्षा कवच बनवण्याच्या ​​तयारीत आहे. हे सुरक्षा कवच प्रथम चार महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गांवर लावले जातील. भारतीय रेल्वेच्या ‘कवच’ प्रणालीमध्ये उच्च वारंवारता असलेल्या रेडिओ कम्युनिकेशनचा वापर केला जाईल. या अंतर्गत, लगतच्या रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाच किलोमीटरच्या परिघात असलेल्या सर्व गाड्या थांबतील. ही योजना 160 किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या रेल्वेसाठी डिझाइन करण्यात आली आहे. केर्नेक्स मायक्रो सिस्टीम्सने 2022 च्या वार्षिक अहवालात म्हटले होते की, भारतीय रेल्वे बोर्डाने सर्व झोनला कवच प्रणालीसाठी निविदा काढण्याचे आदेश दिले होते, आणि आतापर्यंत 3 हजार किमीच्या 1500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी फक्त 10 निविदा काढण्यात आल्या आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Kernex Microsystems India share price return on investment on 13 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या