 
						Multibagger Stocks | म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आघाडीची प्रसिद्ध कंपनी “सारेगामा इंडियाने” गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिल्याचे पाहायला मिळाले आहे. या स्टॉकने मागील 3 वर्षांत शेअर धारकांना 10 पट अधिक म्हणजेच जवळपास 930 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 550 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. ब्रोकरेज हाऊसे या स्टॉकबाबत अतिशय सकारात्मक असून त्यांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकमध्ये अलीकडेच घसरण पाहायला मिळाली होती, त्यामुळे स्टॉकचे मूल्यांकन सुधारले आहे. सध्या स्टॉकच्या आकर्षक मूल्यांकनामुळे शेअरची किंमत वाढण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज हाऊस JM फायनान्शिअलने या स्टॉकमध्ये 22 टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
बाजाराची मजबूत स्थिती :
ब्रोकरेज हाऊस JM फायनान्शिअलने सारेगामा कंपनीचे स्टॉक पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला असून पुढील लक्ष किंमत 450 रुपये निर्धारित केली आहे. ब्रोकरेज हाऊसने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, सारेगामा इंडिया भारतातील दुसरा सर्वात मोठा म्युजिक ब्रँड आहे. नवीन कंटेंटमधील गुंतवणुकीमुळे ही कंपनी पुढील कमालीची वृध्दी करेल अशी अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष 2018-2022 या काळात सारेगामा कंपनीच्या शेअर्समध्ये 26 टक्के वाढ झाली आहे. इतर उद्योगाच्या तुलनेत ही वाढ चांगली आहे.
गुंतवणूक वाढीचा फायदा :
उद्योग वाढीबरोबरच कंपनीने नवीन कंटेंटमध्ये गुंतवणूक करणे वाढवले आहे.याचा फायदा कंपनीला होत आहे. कंपनीने नवीन कंटेंट निर्माण करण्याचे धोरण यशस्वीरित्या लागू केले आहे. कंपनीचा संगीत व्यवसाय आर्थिक वर्ष 22-2025 पर्यंत सुरू राहील. येणाऱ्या काळात हा स्टॉक 23 टक्के CAGR दराने वाढ नोंदवेल अशी अपेक्षा आहे. कंपनीची ऑडिओ OTT स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म सुरू करण्याची योजना असून, याचा कंपनीला भरपुर फायदा होईल.
जोखीम घटक :
सारेगामा इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास काही जोखीम घटक देखील समोर येतात. उदाहरणार्थ, स्पर्धात्मक तीव्रतेमध्ये नवीन कंटेंट निर्मिती करण्याचा खर्च वाढला आहे. कारवाँ/टीव्ही आणि चित्रपट व्यवसायातील गुंतवणूकही मोठ्या प्रमाणत वाढली आहे. कंटेंट निर्माण करणे आणि त्याचे योग्य ठीकणी वितरण करणे हे देखील खर्चिक झाले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		