14 May 2024 11:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, या 5 राशींसाठी पुढचे 17 दिवस अत्यंत लाभदायक, तुमची राशी कोणती? Mutual Fund SIP | पगारदारांची पसंती 'या' स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांना, नोकरदार वर्ग मालामाल होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! जुलैपासून बदलणार DA ची रक्कम, किमान वेतनात वाढ होणार RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा? Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 14 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! 'टाटा पॉवर' शेअर तेजीत पावर दाखवणार, तज्ज्ञांनी दिली नवीन टार्गेट प्राईस

Tata Power Share Price

Tata Power Share Price | सध्या शेअर बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. कोणत्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी, काही समजत नाही. अशा काळात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना टाटा ग्रुपच्या शेअर्सवर अधिक विश्वास वाटतो. म्हणून अनेक तज्ञांनी ‘टाटा पॉवर’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी तुम्ही ‘टाटा पॉवर’ कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. शेअर बाजारातील तज्ञ ‘टाटा पॉवर’ कंपनीच्या शेअरवर उत्साही पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक तज्ञांनी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. डिसेंबरच्या तिमाहीमध्ये टाटा पॉवर कंपनीने बंपर प्रॉफिट कमावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत टाटा पॉवर कंपनीच्या नफ्यात वाढ झाली असून कंपनीने 1,052.14 कोटी रुपये नफा कमावला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Power Company Share Price | Tata Power Company Stock Price | BSE 500400 | NSE TATAPOWER)

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
टाटा पॉवर कंपनीने तिसऱ्या तिमाहीचे जबरदस्त आर्थिक निकाल जाहीर केले. दमदार तिमाही निकालानंतर अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने टाटा पॉवर स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर स्टॉकसाठी 272 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 1.27 टक्के घसरणीसह 205.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तिमाही आर्थिक परिणाम :
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत टाटा पॉवर कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीने 1,052.14 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. टाटा पॉवर कंपनीने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेबीला कळवले की, ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत व्यवसायातील मजबूत उत्पन्नामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या डिसेंबर तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 551.89 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीचा महसुल देखील 11,018.73 कोटींवरून वाढून 14,401.95 कोटी रुपयेवर गेला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share price 500400 TATAPOWER stock market live on 07 February 2023.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x