5 May 2024 5:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

ESIC Covered Benefits | मोफत उपचारांपासून ते पेन्शनपर्यंत, ईएसआयसी कव्हर केलेल्या कर्मचाऱ्यांना मिळतात हे 5 मोठे फायदे

ESIC Covered Benefits

ESIC Covered Benefits | देशात जवळपास १५० पेक्षा जास्त ईएसआयईसी हॉस्पीटल आहेत. यामध्ये सर्वप्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. ज्या कर्मचा-यांना २१ हजारा पर्यंत किंवा त्यापेक्षाही कमी पगार आहे अशा व्यक्तींसाठी हे हॉस्पीटल सेवा पुरवते. तसेच अपंग आणि दिव्यांग व्यक्तींसाठी २५ हजार प्रतीमहिना पगार किंवा त्यापेक्षा  कमी असलेल्यांवर इथे उपचार केले जातात.

ईएसआयईसीमध्ये मोफत उपचारासाठी तुम्हाला एका योजनेचा भाग व्हावे लागते. यात कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांनाही योगदान असते. योजनेत तुमच्या पगारातील १.७५ टक्के आणि ४.७५ टक्के रक्कम नियोक्ता भरत असतो. याचे अनेक फायदे आहेत.

ईएसआयईसीचे फायदे
* ईएसआयईसी मार्फत तुम्हाला मोफत उपचार दिले जातात.
* योजनेचा लाभ घेत असलेल्या व्यक्तीच्या कुटूंबीयांना देखील याचा उपयोग होतो.
* यामध्ये त्या व्यक्तीची पत्नी, मुले, आई, वडील, बहिन, भाऊ इत्यादी सदस्य लाभ घेऊ शकतात. यासाठी उपचाराचा कितीही खर्च असू शकतो. त्यासाठी कमाल मर्यादा दिलेली नाही.
* निवृत्त कर्मचारी किंवा अपंग व्यक्तींना यात वर्षाला १२० रुपयांचा प्रिमियम मिळतो. तसेच विमा धारकाला आजारी असल्यास ९१ दिवसांच्या रजेवर रोख रक्कम दिली जाते.
* यात महिलांना प्रसुती रजा देखील देण्यात आली आहे. प्रसुती असल्यास महिलेला २६ आठवड्यांची रजा आणि गर्भपात असल्यास सहा आठवड्यांची सरासरी काढत त्यावर १०० टक्के रक्कम देण्यात येते.
* यात विमाधारकाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कारासाठी १०,००० रुपये दिले जातात. तसेच त्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्यांना मासिक पेन्शन मिळते. ही पेन्शन तीन टप्प्यांमध्ये दिली जाते.
* आश्रीत असलेल्यांना बेकारी भत्ता, निवृत्ती वेतन, निवृत्तीनंतरही मोफत उपचाराची सुविधा आहे. तसेच कोणत्याही कारणाने विमा घेतलेल्या व्यक्तीला अपंगत्व आले तर त्याला आयूष्यभर पेन्शनची  सुविधा आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : ESIC Covered Benefits Free treatment and pension till death facility through ESIEC 22 October 2022.

हॅशटॅग्स

ESIC Covered Benefits(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x