
Multibagger Stocks | जेव्हा शेअर बाजारात काही मोठी उलाढाल होते, तेव्हा स्मॉलकॅप इंडेक्सवर त्याचा सर्वात जास्त परिणाम पाहायला मिळतो. स्मॉल कॅप शेअरमध्ये जोखीम जास्त असते, परंतु हीच जोखीम नंतर अनेक पट मोठा परतावा बनून तुमच्याकडे पुन्हा येऊ शकते. स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये चढ उतार सुरूच असते, मात्र जेव्हा ते वाढतात तेव्हा गुंतवणुकदारांना करोडपती करून टाकतात. सध्या जर तुम्ही स्मॉल कॅप शेअर्समध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्या काळाचा आहे. आज या लेखात, आम्ही तुम्हाला अशा 3 शेअरची माहिती देणार आहोत, ज्याने अवघ्या 100 दिवसांत 100 टक्के परतावा दिला आहे.
डब्ल्यूपीआयएल लिमिटेड :
WPIL Ltd कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात 2490 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2432 कोटी रुपये आहे. आणि ही मुख्यतः पंप बनवण्याचे काम करते. मागील तीन महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 115 टक्क्यांनी वधारले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 190.78 टक्के वाढले आहेत. 28 डिसेंबर 2022 रोजी हा शेअर 1171 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी या स्टॉक 4.41 टक्के वाढीसह 2,600.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
WPIL Ltd मल्टीबॅगर परतावा :
WPIL Ltd कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक सिद्ध झाले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 10.40 9 टक्के वाढले आहेत. मागील एका महिन्यात शेअरची किंमत 3.24 टक्के वर गेली आहे. तर मागील सहा महिन्यात स्टॉक 105.21 टक्के वाढला आहे.
मोल्ड टेक टेक्नॉलॉजीज :
या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात 242 रुपये किमतीवर क्लोज झाले होते या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 275 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 80 रुपये होती. या कंपनीचे बाजार भांडवल 684 कोटी रुपये आहे. ही कंपनी बीपीओ सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 119 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 100 दिवसांनंतर हा स्टॉक 103 टक्क्यांनी वाढून 242 रुपयांवर पोहोचला आहे. आज सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 12.58 टक्के वाढीसह 273.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने 13.80 टक्के परतावा दिला आहे. मागील एका महिन्यांत 10.66 टक्के परतावा दिला आहे. एका वर्षात 214.52 टक्के आणि पाच वर्षांत 437.40 टक्के परतावा दिला आहे.
प्रवेग लिमिटेड :
मीडिया क्षेत्रातील या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात 469 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 30 डिसेंबर 2022 रोजी हा स्टॉक 267 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 0.42 टक्के घसरणीसह 465.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 10 दिवसांत या शेअरची किंमत 75 टक्क्यांनी वाढली आहे. या मीडिया कंपनीचे बाजार भांडवल 981 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 612 रुपये होती. तर 52 आठवड्याची नीचांक पातळी किंमत 122 रुपये होती. या कंपनीच्या शेअरने मागील 1 वर्षात लोकांना 247.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षात शेअरची किंमत 5,749.06 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.