
Nazara Technologies Share Price | ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजीत धावत आहेत. 17 मे 2023 रोजी ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 567 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. काल हा स्टॉक 632.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. पोहो. मागील दोन दिवसांत ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 45 रुपये वाढले आहे. (Nazara Technologies Share Price NSE)
शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 2.90 टक्के वाढीसह 597.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स तेजीत येण्याचे कारण म्हणजे त्याची उपकंपनी नॉडविन गेमिंग कंपनीने गुंतवणूकदारांकडून 231 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. कंपनी ही रक्कम गेमिंग आणि ई स्पोर्टस विभाग विकसित करण्यासाठी खर्च करणार आहे. (Nazara Technologies Share Price BSE)
शुक्रवारी ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 592.10 रुपये किमतीवर ओपन झाले होते, आणि 632.40 रुपये या दिवसाच्या उच्चांक किमतीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 783.70 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 475.05 रुपये होती. मागील एका महिन्यात 19 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मात्र दोन वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना आगा 27 टक्के तोटा सहन करावा लागत आहे. शेअर बाजारातील 10 पैकी 8 तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 6 जणांनी तत्काळ खरेदीची शिफारस केली आहे. एका तज्ज्ञाने स्टॉक विक्रीचा सल्ला दिला आहे, तर दोघांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
खरेदी करण्यापूर्वीही डिटेल वाचा :
‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स आपल्या स्पर्धक कंपन्याच्या तुलनेत आर्थिक, मालकी, मूल्यांकन गती आणि कामगिरी या सर्व बाबतीत मजबूत आहे. आर्थिक आघाडीवर, या कंपनीच्या शेअर्सवर तज्ञांनी 4 सकारात्मक आणि 4 नकारात्मक गुण दिले आहे. मालकीच्या बाबतीत तज्ञांनी स्टॉकवर 2 सकारात्मक आणि 2 नकारात्मक गुण दिले आहे. तर स्पर्धक कंपन्याच्या तुलनेत तज्ञांनी स्टॉकवर 2नकारात्मक आणि 2 सकारात्मक गुण दिले आहे.
मूल्य आणि गती या दोन्ही बाबीवर स्टॉक मजबूत पाहायला मिळत आहे. या बाबतीत स्टॉकवर 2 नकारात्मक आणि 6 सकारात्मक गुण देण्यात आले आहे. तज्ञांनी स्टॉकवर एकूण 14 सकारात्मक आणि 9 नकारात्मक गुण देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.