
Netweb Technologies Share Price | नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया कंपनीच्या शेअरची धमाकेदार लिस्टिंग पाहायला मिळाली आहे. नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया कंपनीच्या शेअर्सने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 942.50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. (Netweb Share Price)
या कंपनीचे शेअर्स आपल्या IPO किमत बँडच्या तुलनेत 88.50 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावले होते, त्यांना लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 442.50 रुपये नफा मिळाला आहे. आज शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के वाढीसह 913 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया कंपनीचे शेअर्स 947 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया कंपनीचा IPO स्टॉक एकूण 90.55 पट सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 19.48 पट सबस्क्राइब झाला आहे.
पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 220.69 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 83.21 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. आणि कर्मचाऱ्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 55.92 पट सबस्क्राईब झाला होता.
नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया कंपनीच्या स्टॉकला ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ग्रे मार्केटमध्ये नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया कंपनीचे शेअर्स 400 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचा IPO 17 जुलै ते 19 जुलै दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया कंपनीच्या IPO चा आकार 631 कोटी रुपये होता. या कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 475-500 रुपये निश्चित करण्यात आली होती. तर कंपनीचे शेअर्स 500 रुपये या अप्पर किंमत बँडवर वाटप झाले आहेत. किरकोळ गुंतवणूकदार Netweb Technologies IPO मध्ये किमान 1 लॉटसाठी आणि कमाल13 लॉटमध्ये पैसे लावू शकत होते. IPO च्या एका लॉटमध्ये कंपनीने 30 शेअर्स जारी केले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.