
Newgen Share Price | 4 डिसेंबर रोजी न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. जेफरीजने न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 1,740 रुपये निश्चित केली आहे.
जेफरीज फर्मने न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीच्या महसूल वाढीचा अंदाज 2-3 टक्क्यांनी आणि त्याचा EPS अंदाज 2-4 टक्क्यांनी वाढवला आहे. तज्ञांच्या मते, न्यूजेन कंपनीचे EPS आर्थिक वर्ष 2024-26 मध्ये 26 टक्के दरावर पोहोचू शकते. आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 0.74 टक्के घसरणीसह 1,435 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
4 डिसेंबर 2023 रोजी न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 1473.95 रुपये किमतीवर ओपन झाले होते. अल्पावधीत हा स्टॉक 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करू लागला. न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 1489 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 329 रुपये होती.
मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 109.87 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 283.02 टक्के मजबूत झाले आहेत. YTD आधारे न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 296.24 टक्के परतावा कमावून दिला आहे.
न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर बाबत अनेक तज्ज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. या कंपनीने आपल्या विद्यमान आणि नवीन ग्राहकांमध्ये आपले सेल्स प्रमाण वाढवण्यासाठी वर्टिकल स्पेसिफिक पॉइंट सॉल्यूशन बेस्ड दृष्टिकोन स्वीकारला आहे. न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीच्या ट्रेड फायनान्स प्रोडक्टने कंपनीला नऊ मोठे सौदे मिळवून दिले आहेत.
कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने म्हटले आहे की 350 दशलक्ष डॉलर्सच्या टॉपलाइनवर पोहोचल्यानंतर, न्यूजेन कंपनीचे एकूण मार्जिन 10-12 अंकांनी वाढण्याची शक्यता आहे. कंपनीला अपेक्षित असलेली वाढ प्रामुख्याने भारत आणि मध्य पूर्वेतील देशातून पाहायला मिळू शकते.
न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. न्यूजेन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीच्या संचालक मंडळाने 27 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शेअर धारकांना मोफत बोनस वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून 12 जानेवारी 2024 हा दिवस निश्चित केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.