
NHPC Share Price | बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी NHPC शेअर 0.83 टक्के घसरून 77.95 रुपयांवर पोहोचला (NSE: NHPC) होता. गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी हा शेअर 3.01 टक्के वाढून 80.53 रुपयांवर पोहोचला होता. एनएचपीसी कंपनी शेअर मागील पाच सत्रांमध्ये जवळपास ११ टक्क्यांनी घसरला आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
कंपनीने महत्वाची अपडेट दिली
एनएचपीसी लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला दिलेल्या माहितीनुसार, ‘सिक्कीममधील भूस्खलनामुळे ५१० मेगावॅटच्या तिस्ता-५ वीज केंद्रावर परिणाम झाला असून अंदाजे 327.67 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती एनएचपीसी कंपनीने मंगळवारी दिली. कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे, 20 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या भूस्खलनामुळे 327.67 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून नुकसानीचा अहवाल इन्शुरन्स कंपनीला सादर करण्यात आला आहे.
NHPC कंपनीने दिलेल्या माहितीप्रमाणे, 2008 मध्ये कार्यान्वित झालेले तिस्ता-5 पॉवर स्टेशन ही तिस्ता नदीच्या जलविद्युत क्षमतेचा वापर करण्यासाठी, विशेषत: कमी हंगामात, दैनंदिन साठवणुकीसह रन-ऑफ-द-रिव्हर योजना आहे.
व्हेंचुरा ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला व्हेंचुरा ब्रोकरेज फर्मने NHPC शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. व्हेंचुरा ब्रोकरेज फर्मने NHPC शेअरसाठी 176 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. त्यासाठी 2 वर्षाचा कालावधी दिला होता.
शेअरचा शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस
NHPC कंपनी शेअर मागील पाच दिवसात 11.29% घसरला आहे. लाईव्ह मिंटच्या तज्ज्ञांनी NHPC कंपनी कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. NHPC कंपनी स्टॉक टेक्निकल रिपोर्टनुसार, हा शेअर 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या दीर्घकालीन मूव्हिंग ऍव्हरेजेस’च्या खाली ट्रेड करत आहे.
क्लासिक पिव्हट लेव्हल
बुधवार २३ ऑक्टोबर २०२४ रोजी NHPC कंपनी शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 80.68 रुपये, 83.16 रुपये आणि 85.95 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 75.41 रुपये, 72.62 रुपये आणि 70.14 रुपये आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.