 
						NHPC Share Price | एनएचपीसी या सरकारी जलविद्युत उर्जा उत्पादक कंपनीचे शेअर्स गुरुवारी मजबूत तेजीत वाढत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात या कंपनीचे शेअर्स 2.6 टक्क्यांच्या वाढीसह 90.95 रुपये इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( एनएचपीसी कंपनी अंश )
या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 6,100 कोटी रुपये कर्ज उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी एनएचपीसी स्टॉक 0.51 टक्के वाढीसह 89.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
बुधवारी एनएचपीसी कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाने पार पडलेल्या बैठकीत खाजगी प्लेसमेंट, मुदत कर्जाच्या आधारे एक किंवा अधिक हप्त्यांमध्ये नॉन-कन्व्हर्टेबल कॉर्पोरेट बाँड्स जारी करून कर्ज उभारणीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 या काळात कंपनी 6100 कोटी रुपये बाह्य व्यावसायिक कर्ज उभारणार आहे.
याशिवाय एनएचपीसी कंपनीच्या संचालक मंडळाने मणिपूर सरकारसोबत लोकटक डाउनस्ट्रीम हायड्रोइलेक्ट्रिक कॉर्पोरेशन लिमिटेड या संयुक्त उपक्रमाची स्थापना करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हा संयुक्त उपक्रम भारतीय ऊर्जा मंत्रालय आणि मणिपूर सरकारच्या अधीन काम करेल.
एनएचपीसी स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 54 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्या ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाहीये. या स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 1 आहे. जो उच्च अस्थिरता दर्शवत आहे. टेक्निकल चार्टचे निरीक्षण केल्यास आपल्याला समजेल की, एनएचपीसी स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेज किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		