
Nykaa Share Price | सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत Nykaa कंपनीने जाहीर केलेल्या निकालानंतर सौंदर्य आणि फॅशन ई-टेलर कंपनी Nykaa चे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के कमजोर झाले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Nykaa कंपनीचे शेअर 1,150 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. Nykaa कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 56 टक्के कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. तथापि, ब्रोकरेज फर्म Nykaa कंपनीच्या स्टॉकबाबत अतिशय सकारात्मक आणि उत्साही दिसून येत आहे. तज्ञांनी हे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म अंदाज आहे की, पुढील 12 महिन्यांत Nykaa कंपनीचे स्टॉक 90 टक्के मजबूत होऊ शकतात.
शेअरची पुढील लक्ष्य किंमत :
HSBC ने Nykaa कंपनीच्या शेअर्सवर 2,170 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. ही लक्ष किंमत हे सध्याच्या ट्रेडिंग किंमतीच्या तुलनेत 90 टक्के पेक्षा अधिक आहे. ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, Nykaa कंपनीच्या शेअर्सची किंमत सध्या खरेदी करण्यासाठी एकदम आकर्षक आहे. सौंदर्य प्रसाधन आणि पर्सनल केअर क्षेत्रांमध्ये पुढील येणाऱ्या काळात मजबूत वाढ होण्याचे संकेत मिळत आहे. तज्ञांनी म्हंटले आहे की, “आमच्या अंदाजानुसार BPC आणि ई-कॉमर्स एक परिपूर्ण जुळणी असून पुढील येणाऱ्या दशकात बीपीसी ई-कॉमर्स मार्केटमध्ये 30 टक्के CAGR वाढ होण्याची अपेक्षा आहे”.
स्टॉक खरेदीचा सल्ला :
शेअर बाजार तेजीत असताना विदेशी ब्रोकरेज हाऊस जेफरीजने Nykaa कंपनीचे शेअर्सचे बाय रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. Nykaa कंपनीच्या शेअर्ससाठी ब्रोकरेज हाऊस जेफरीजने 1,650 रुपयेची लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज हाऊस आणि रिसर्च फर्म एडलवाईसने देखील Nykaa कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एडलवाईसने Nykaa कंपनीच्या शेअरची लक्ष्य किंमत 1506 रुपये निश्चित केली आहे. इतर जागतिक ब्रोकरेजमध्ये, मॉर्गन स्टॅनलीने Nykaa कंपनीच्या शेअर्ससाठी 1,889 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. BofA ने Nykaa कंपनीच्या शेअर्सची लक्ष किंमत 1,555 रुपये ,तर बर्नस्टीनने 1,547 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
कंपनीचे तिमाही निकाल :
Nykaa कंपनीने आपले जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीत अप्रतिम प्रॉफिट कमावला आहे. Nykaa कंपनीने सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत 5.2 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा मिळवला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत Nykaa कंपनीचा नफा फक्त एक कोटी रुपये होता. म्हणजेच मागील एका वर्षात कंपनीच्या नफ्यात 330 टक्के पेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्याच वेळी, जून 2022 तिमाहीत Nykaa ने 5 कोटी रुपयेचा निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.