 
						Paras Defence Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजाराचा कल बराच नकारात्मक होता. सुरुवातीला शेअर बाजार किंचित प्रमाणात वाढला मात्र, हळूहळू त्यात विक्रीचा दबाव वाढू लागला आणि दिवसा अखेर बाजार लाल निशाणीवर बंद झाला. अशा अस्थिर काळात ही ‘पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. ट्रेडिंग सेशन दरम्यान सुरुवातील हा स्टॉक 5 टक्क्यांपर्यंत वाढून 505 रुपयांवर पोहचला होता. मात्र नंतर त्यात प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि स्टॉक 2.38 टक्के वाढीस 491.85 रुपये किमतीवर क्लोज झाला. गुरुवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के घसरणीसह 488.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Paras Defence and Space Technologies Ltd)
स्टॉक वाढीचे कारण :
‘पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी’ कंपनीने इस्रायलस्थित ‘कॉन्ट्रोप प्रिसिजन टेक्नॉलॉजी’ कंपनीशी एक व्यापारी करार केला आहे. भारतीय आणि जागतिक संरक्षण क्षेत्रात नवीन संधी निर्माण करून दोन्ही पक्षांसाठी व्यवसाय वाढवणे हे या कराराचे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘पारस डिफेन्स’ कंपनीने संयुक्त उपक्रमाची तयारी दर्शवली आहे. पारस डिफेन्स कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या 40 टक्के महसूल वाढ नोंदवली होती. तर कंपनीच्या निव्वळ नफ्यात ही 28 टक्क्यांची वाढ झाली होती.
शेअरची कामगिरी :
27 फेब्रुवारी 2023 रोजी ‘पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 455.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांची नीचांकी किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 811.35 रुपये होती. या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 23.66 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,926.02 कोटी रुपये आहे. या कंपनीचा IPO 2021 मध्ये गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		