 
						Penny Stocks | मागील काही महिन्यांपासून अक्षर स्पिनटेक्स कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मात्र आता या कंपनीचे शेअर्स एका वेगळ्या बातमीसाठी चर्चेत आले आहेत. अक्षर स्पिनटेक्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. Akshar Spintex Share Price
या बैठकीत कंपनीचे संचालक आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स, लाभांश आणि बायबॅक यासारखे लाभ देण्याचा निर्णय घेऊ शकतात. आज बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी अक्षर स्पिनटेक्स स्टॉक 4.83 टक्के घसरणीसह 6.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2023 मधील जुलै महिन्यात अक्षर स्पिनटेक्स कंपनीने आपले शेअर्स 10 भागात विभाजित केले होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अक्षर स्पिनटेक्स कंपनीचे शेअर्स 7.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 15 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बोनस शेअर्स , बायबॅक आणि अंतरिम लाभांश वाटप करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
मागील एका वर्षभरात अक्षर स्पिनटेक्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला होता. तर मागील सहा महिन्यांत अक्षर स्पिनटेक्स कंपनीच्या शेअरमध्ये फक्त 3 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. अक्षर स्पिन्टेक्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 8.40 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 4.85 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		