
Penny Stocks | शेअर बाजारात गुरुवारी मजबूत तेजी दिसून आली आहे. स्टॉक मार्केटमधील तेजी दरम्यान फ्रँकलिन इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. फ्रँकलिन इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट केला होता. गेल्या १ महिन्यात या पेनी शेअरने 35.41% परतावा दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांची शॉर्ट टर्ममध्ये मल्टीबॅगर कमाई होते आहे.
1 महिन्यात पेनी शेअरने 35.41% परतावा दिला
गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी फ्रँकलिन इंडस्ट्रीज शेअर 4.81 टक्क्यांनी वाढून 2.83 रुपयांवर पोहोचला होता. फ्रँकलिन इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळी 4.13 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांचा नीचांकी पातळी 1.28 रुपये होती. मागील काही महिन्यांपासून फ्रँकलिन इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देतोय.
गुंतवणूकदारांना 708 टक्के परतावा दिला
मागील ५ दिवसात फ्रँकलिन इंडस्ट्रीज शेअरने 9.69% परतावा दिला आहे. गेल्या महिन्याभरात या शेअरने 35.41% परतावा दिला आहे. त्याचबरोबर मागील १ वर्षात या पेनी शेअरने 119.38% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 708.57% परतावा दिला आहे. या शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरु झाली आहे.
लो पी/ई स्टॉक
फ्रँकलिन इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे नफा ते उत्पन्न गुणोत्तर (पी/ई) १.५० आहे, जो सकारात्मक संकेत मानता येईल. पीई रेशो म्हणजे गुंतवणूकदार एखाद्या शेअरमध्ये 1 रुपया कमावण्यासाठी किती पैसे गुंतवणूक करत आहेत. कमी पीई रेशो असलेले शेअर्स स्वस्त मानले जातात. सध्या फ्रँकलिन इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 81.8 कोटी रुपये आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.