
Penny Stocks | गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये घसरण झाली असली तरी सत्व सुकून लाइफकेअर लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये तुफान तेजी आहे. गुरुवार, 09 जानेवारी 2025 रोजी सत्व सुकून लाइफकेअर कंपनी शेअर 0.88 टक्क्यांनी वाढून 2.30 रुपयांवर पोहोचला होता.
सत्व सुकून लाइफकेअर कंपनी शेअर्समधील तेजीचे कारण म्हणजे कंपनीने फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. सत्व सुकून लाइफकेअर कंपनीने गुंतवणूकदारांना ३:५ प्रमाणात फ्री बोनस शेअर्स देण्याचे जाहीर केले आहे. कंपनीने त्यासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.
बोनस शेअरचा तपशील
सत्व सुकून लाइफकेअर लिमिटेड कंपनी गुंतवणूकदारांना पाच शेअर्सवर ३ फ्री बोनस शेअर्स देणार आहे. या फ्री बोनस शेअर्ससाठी सत्व सुकून लाइफकेअर कंपनीने १७ जानेवारी २०२५ ही रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. म्हणजे ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात १७ जानेवारी २०२५ पर्यंत या कंपनीचे शेअर्स असतील त्यांच्या डिमॅट खात्यात फ्री बोनस शेअर्स जमा होतील.
सत्त्व सुकुन लाईफकेअर कंपनीची आर्थिक स्थिती
दुसऱ्या तिमाहीत सत्त्व सुकुन लाईफकेअर लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा ०.२७ कोटी रुपयांवरून म्हणजे १२४.९ टक्क्यांनी वाढून ०.६२ कोटी रुपयांवर पोहोचला होता. सत्त्व सुकुन लाईफकेअर कंपनीचा EBITDA १२५.५८ टक्क्यांनी वाढला आहे.
सत्त्व सुकुन लाईफकेअर कंपनीबद्दल
सत्त्व सुकुन लाईफकेअर लिमिटेड कंपनी बर्नरचे उत्पादन आणि विक्री व्यवसायात कार्यरत असलेली कंपनी आहे. बर्नर आणि व्हेपोरायझरचे उत्पादन आणि विक्री हे सत्त्व सुकुन लाईफकेअर कंपनीचे मुख्य उत्पन्न स्रोत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.