
PKH Ventures IPO | पीकेएच वेंचर्स या बांधकाम आणि हॉस्पिटॅलिटी कंपनीचा IPO आज 30 जून 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. या IPO चा आकार 379 कोटी रुपये असेल. हा IPO 4 जुलै 2023 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला ठेवला जाईल. पीकेएच वेंचर्स कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 140-148 रुपये निश्चित केली आहे. चला तर मग जाणून घेऊ IPO चे सविस्तर तपशील.
1) पीकेएच वेंचर्स कंपनीचा IPO 30 जून ते 4 जुलै दरम्यान गुंतवणुकीसाठी ओपन असेल. रोजी बंद होईल .
2) पीकेएच वेंचर्स कंपनीच्या IPO साठी शेअरची किंमत बँड 140-148 रुपये जाहीर करण्यात आली आहे.
3) पीकेएच वेंचर्स कंपनी आपल्या IPO मध्ये एकूण 2.56 कोटी शेअर खुल्या बाजारात विकणार आहे. या कंपनीचे 63.69 टक्के भाग भांडवल धारण करणारे प्रवीण कुमार अग्रवाल 1.82 कोटी शेअर्स फ्रेश इश्यू अंतर्गत आणि 73.73 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहेत.
4) अप्पर प्राइस बँडनुसार पीकेएच वेंचर्स IPO चा एकूण आकार 379.35 कोटी रुपये असेल. तर कंपनीचे बाजार भांडवल 1,217 कोटी रुपये आहे.
5) एका लॉटमध्ये 100 शेअर्स असतील. किरकोळ गुंतवणूकदार कमाल 13 लॉट्ससाठी बोली लावू शकतात. एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान 14,800 रुपये जमा करावे लागेल.
6) 7 जुलै रोजी गुंतवणुकदारांना स्टॉक वाटप केले जातील. तर 10 जुलै रोजी स्टॉक सूचीबद्ध केला जाईल. 11 जुलै रोजी स्टॉक डिमॅट खात्यात जमा होतील. 12 जुलैला शेअर सूचीबद्ध केला जाईल.
7) पीकेएच वेंचर्स IPO मध्ये आयडीबीआय कॅपिटलला बुक रनिंग मॅनेजर म्हणून तर लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ला आयपीओ रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
8) IPO नंतर PKH व्हेंचर्समधील प्रवर्तकांचा वाटा 100 टक्के वरून कमी होऊन 68.84 टक्के होईल.
9) कंपनी IPO मधून जमा होणारी 124.12 कोटी रक्कम जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी आणि उपकंपनी हलाईपानी हायड्रो प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खर्च करेल. दीर्घकालीन खेळत्या भांडवलाचा खर्च म्हणून 80 कोटी रुपये खर्च करेल. इतर धोरणात्मक उपक्रमांद्वारे अजैविक वाढीसाठी 40 कोटी रुपये खर्च करेल.
10) पीकेएच वेंचर्स कंपनीने IPO मध्ये 50 टक्के वाटा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवला आहे, 15 टक्के वाटा गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. तर उर्वरित 35 टक्के वाटा ऑफर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.