20 May 2024 4:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा
x

Wipro TCS & Infosys Shares | आयटी शेअर्सला नेमकं झालंय तरी काय? विप्रो, TCS, इन्फोसिस शेअर्स थंडगार का पडले आहेत? पुढे काय?

Highlights:

  • Wipro TCS & Infosys Shares
  • TCS स्टॉक
  • Wipro स्टॉक
  • Infosys स्टॉक
  • L & T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आणि HCL टेक्नॉलॉजीज स्टॉक
Wipro TCS & Infosys Shares

Wipro TCS & Infosys Shares | यूएस आणि युरोपमध्ये सध्या सुरू असलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय आयटी कंपन्यांनी मागील दोन वर्षांत निराशाजनक कामगिरी केली आहे. जून 2021 पासून टॉप चार आयटी कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे जबरदस्त नुकसान केले आहे. विप्रो कंपनीच्या शेअरमध्ये मागील दोन वर्षात 30.11 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे.

27 जून 2023 रोजी विप्रो कंपनीचे शेअर्स 382.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 28 जून 2021 रोजी विप्रो स्टॉक 547.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील दोन वर्षात इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 18.62 टक्के, तर एमफेसिस कंपनीचे शेअर्स 10.25 टक्के, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस स्टॉक 4.18 टक्के घसरला आहे.

TCS स्टॉक

TCS कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3215.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.58 टक्के वाढीसह 3,298.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी TCS स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Wipro स्टॉक

काल या कंपनीचे शेअर्स 381.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. विप्रो स्टॉकची 52 आठ्वड्यांची नीचांकी किंमत पातळी 352 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.93 टक्के वाढीसह 389.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Infosys स्टॉक

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 1.11 टक्क्यांनी वाढून 1293.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1672.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1185.30 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.44 टक्के वाढीसह 1337.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

बदलत्या तंत्रज्ञानाच्या लँडस्केपमुळे यूएस, युरोप आणि भारतीय IT सेवा कंपन्यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये जबरदस्त मंदी निर्माण झाली आहे. भारतीय IT कंपन्यांच्या कमाईमध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. मागील 12-15 महिन्यांत मूल्यांकन प्रीमियम दीर्घकालीन सरासरी मूल्यांकनाच्या पटीत सामान्य असलेला पाहायला मिळत आहे. कमाईमध्ये होणारी घसरण पुढील काळात आणखी वाढू शकते.

एकीकडे विप्रो, TCS, इन्फोसिस कंपनीचे शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकले होते, तर दुसरीकडे पर्सिस्टंट सिस्टिम्स सारख्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत होते. 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4,891.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 28 जून 2021 रोजी हा स्टॉक 2,702.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या काळात शेअरची किंमत 81 टक्के वाढली आहे.

L & T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आणि HCL टेक्नॉलॉजीज स्टॉक

L & T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस स्टॉकमध्ये 33.40 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर एलटीआय इंडट्री स्टॉकमध्ये 25.245 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीज स्टॉकमधे दीन वर्षात 18.75 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर कोफोर्ज स्टॉक 13.90 टक्क्यांनी वाढला आहे. टेक महिंद्रा स्टॉक मागील दोन वर्षात 1.32 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Wipro TCS & Infosys Shares today on 30 June 2023

हॅशटॅग्स

Wipro TCS & Infosys Shares(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x