2 May 2025 1:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

PPF Investment | तुमच्या पीपीएफ खात्याची 15 वर्षाची मुदत पूर्ण झल्यास अधिक नफ्यासाठी काय करावे जाणून घ्या

PPF investment

PPF Investment | जर आपण पीपीएफ गुंतवणूक करत असाल तर आपल्याला माहीतच असेल की पीपीएफ योजनेचा कार्यकाळ 15 वर्षांचा असतो. आणि जा कालावधी आणखी पाचसाठी वाढवता येऊ शकतो. PPF खात्याचा व्याज दर तिमाहीत सरकारद्वारे बदलत असतो. सध्या या पीपीएफ खात्यावर 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी कॅल्क्युलेटर:
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी उपलब्ध सर्व गुंतवणूक पर्यायांपैकी सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित योजना आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही भारत सरकारची योजना असल्याने यामध्ये गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात कारण यावर सरकार सुरक्षा हमी देते. तसेच, या योजनेत विशिष्ट परतावा आणि कर सवलत देखील उपलब्ध आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी :
पीपीएफमधील गुंतवणूक, त्यावर मिळणारे चक्रवाढ व्याज आणि मुदतपूर्तीनंतर मिळणारी परतावा रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. यामध्ये, खाते उघडल्यानंतर काही वर्षांनी कर्ज घेण्याची मुभा आणि गरजेच्या वेळी काही पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. या योजनेचा कार्यकाळ 15 वर्षांचा असतो. ते आणखी पाच वर्षासाठी वाढवता येऊ शकते. पीपीएफ खात्याचा व्याज दर प्रत्येक तिमाहीत सरकार कमी जास्त प्रमाणात बदलत असते. सध्या सरकारने PPF वर 7.1 टक्के व्याज परतावा घोषित केला आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केल्यावर आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळतो.

पंधरा वर्षांचा मुदत कालावधी पूर्ण झाला की काय करावे :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचा कार्यकाळ कमाल 15 वर्षांचा ठरवण्यात आला आहे. 15 वर्ष मुदत पूर्ण झाली की तुम्ही पैसे काढून घेऊ शकता किंवा ही योजना आणखी 5 वर्षांसाठी वाढवू शकता. योजना कालावधी संपल्यापासून एक वर्षापूर्वी तुम्हाला तुमच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये, जेथे तुमचे पीपीएफ खाते असेल तेथे मुदतवाढीसाठी अर्ज करावा लागेल. अशा प्रकारे तुम्ही पीपीएफ मध्ये एकूण वीस वर्षांसाठी पैसे गुंतवणूक करू शकता.

गुंतवणूक न करताही खाते सुरू ठेवता येते :
पीपीएफ खात्याच्या मुदतपूर्ती नंतर, तुम्ही कोणतीही कारवाई न केल्यास , किंवा योजना मर्यादा वाढवली नाही किंवा पैसे काढून घेतले नाही तर, तुमचे खाते आपोआप पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी वाढवले ​​जाईल. आपण यामध्ये आपले पैसे जमा करू शकत नाही, पण तुम्हाला खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत राहील.

कर्ज सुविधा :
तुम्हाला पीपीएफ खात्यावरही कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. हे कर्ज पीपीएफ खाते उघडण्याच्या तिसऱ्या ते सहाव्या वर्षापर्यंत घेतले जाऊ शकते. कर्जाची कमाल रक्कम शिल्लक रकमेच्या 25 टक्के पेक्षा जास्त असू नये.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PPF investment returns after 15 years maturity benefits on 29 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PPF(43)#PPF Investment(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या