30 April 2025 11:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या
x

Reject Zomato Trending | हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे असं झोमॅटोचं प्रतिउत्तर आणि वाद पेटला

Reject Zomato Trending

चेन्नई, १९ ऑक्टोबर | देशातील प्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो नव्या वादात अडकली आहे. परिणामी कंपनीला समाज माध्यमांवर प्रचंड प्रमाणावर रोषाचा सामना करावा लागला आहे. तामिळनाडूच्या एका ग्राहकाने सांगितले की, कंपनीमध्ये काम करणाऱ्या कस्टमर सर्व्हिसने त्याला हिंदी भाषा शिकून घेण्याचा सल्ला दिला कारण हिंदी आपली ‘राष्ट्रभाषा’ आहे. या ग्राहकाने याबाबत तक्रार करत पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर ‘रिजेक्ट झोमॅटो’ ट्रेंड करण्यास (Reject Zomato Trending) सुरुवात झाली. आता झोमॅटोने याबाबत जाहीर माफी मागितली आहे.

Reject Zomato Trending. The post, shared by a Twitter user from Tamil Nadu named Vikash, has now gone viral with thousands of reactions denouncing Hindi as a national language. The hashtag #RejectZomato started trending on Twitter furiously after the tweet went viral :

तामिळनाडूच्या विकास नावाच्या ग्राहकाने ऑर्डरबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर त्याचे झोमॅटोच्या कस्टमर सर्व्हिसशी रिफंड बाबत बोलणे चालू होते. यादरम्यान झोमॅटोच्या कर्मचाऱ्याने त्याला हिंदी भाषा शिकून घेण्याचा सल्ला दिला कारण या कर्मचाऱ्याच्यामते हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा आहे. हे ऐकून ग्राहकाच्या रागाचा पारा चढला आणि त्याने याबाबत तक्रार करत आपल्या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला. ट्विटरवर या ग्राहकाने सांगितले की, त्याला हिंदी भाषा येत नसल्याने त्याच्या ऑर्डरचा परतावा दिला गेला नाही.

विकासने यावर आक्षेप घेत म्हटले की जर झोमॅटो तामिळनाडूमध्ये आपला व्यवसाय करत असेल तर त्यांनी तमिळ भाषा जाणणाऱ्या लोकांना कामावर ठेवले पाहिजे. झोमॅटोशी झालेल्या वादाची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लोकांनी कंपनीवर टीका करायला सुरुवात केली. युझर्सचा रोष पाहता कंपनीने माफी मागत त्या कस्टमर सर्व्हिस कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Reject Zomato Trending on social media after Tamil Nadu customer shared on social media.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या