8 May 2024 3:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हा सरकारी शेअर खरेदी करा, अल्पावधीत मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा

Stocks To Buy

Stocks To Buy | एचपीसीएल लिमिटेड या महारत्न दर्जा असणाऱ्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. एचपीसीएल लिमिटेड या भारतातील आघाडीच्या तेल विपणन कंपनीचे शेअर्स अवघ्या तीन महिन्यांत 45 टक्के वाढले आहेत. वास्तविक ही कंपनी आपली ऑईल शुद्धीकरण क्षमता वाढवत आहे. याशिवाय अनेक सकारात्मक घटक या सरकारी कंपनीचे शेअर्स आकर्षक बनवत आहेत. ब्रोकरेज फर्मच्या मते, एचपीसीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स सध्याच्या किमतीच्या तुलनेत 50 टक्के वाढू शकतात.

7 डिसेंबर रोजी एचपीसीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 396 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहोचले होते. तर शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी एचपीसीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.77 टक्के घसरणीसह 376.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने एचपीसीएल लिमिटेड या तेल विपणन कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 550 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. याआधी तज्ञांनी 365 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली होती, ज्यात आता 45 टक्के पेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे.

ब्रोकरेजने आपल्या अहवालात म्हटले की, एचपीसीएल लिमिटेड कंपनीसाठी रिफायनिंग मार्जिन बेंचमार्क सिंगापूर रिफायनिंग मार्जिनच्या तुलनेत प्रति बॅरल 3-4 डॉलर्स प्रीमियमवर जाण्याची शक्यता आहे. किरकोळ इंधन मार्जिनमध्ये सतत वाढ होत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार इंधनाचे दर कमी करण्याची शक्यता होती, मात्र सरकारने इंधन दरात बदल केला नाही. त्यामुळे किरकोळ मार्जिनवर दबाव निर्माण झाला आहे. हे सर्व घटक एचपीसीएल लिमिटेड कंपनीसाठी सकारात्मक भूमिका बजावत आहेत.

तज्ञांच्या मते एचपीसीएल स्टॉक सध्या आकर्षक मूल्यांकनावर आहे. अशा स्थितीत या कंपनीचे शेअर्स दीर्घ मुदतीत जबरदस्त कमाई करून देऊ शकतात. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 9 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील तीन महिन्यांत एचपीसीएल लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 45 टक्के वाढली आहे. तर 2023 या वर्षात एचपीसीएल लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे 60 टक्के वाढवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy call on HPCL Share Price NSE 09 December 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(282)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x