
Reliance Communications Share Price | एकेकाळी भारतातील श्रीमंतांच्या यादीत सामील असलेले उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. यापैकी एक कंपनी आहे, ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी आरकॉम कंपनीचे शेअर्स 2.94 टक्के वाढीसह 1.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 2007 मध्ये या कंपनीचे शेअर 786 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, मात्र आता हा स्टॉक 1.75 रुपये किमतीवर आला आहे मागील एका वर्षाच्या कालावधीत स्टॉकची किंमत 59 टक्के कमी झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Reliance Communications Share Price | Reliance Communications Stock Price | BSE 532712 | NSE RCOM)
जिओ सोबत भागीदारी :
भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी ‘रिलायन्स जिओ’ ने अनिल अंबानींच्या कर्जबाजारी रिलायन्स इन्फ्राटेलचे मोबाईल टॉवर आणि फायबर मालमत्ता ताब्यात घेण्याची घोषणा केली होती. रिलायन्स जिओने स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI च्या एस्क्रो खात्यात 3720 कोटी रुपये जमा केल्याची बातमी देखील आली होती. याचा अर्थ मुकेश अंबानी पुढील काळात आरकॉम कंपनीची मालमत्ता ताब्यात घेणार आहे.
4 मार्च 2020 रोजी जिओच्या रिझोल्यूशन प्लॅनला कमिटी ऑफ क्रेडिटर्सने 100 टक्के मतांनी मंजुरी दिली होती. RITL कंपनीकडे संपूर्ण भारतात 1.78 लाख किलोमीटर लांबीची फायबर मालमत्ता आणि 43,540 मोबाइल टॉवर आहेत. अनिल धीरूभाई अंबानी समूहाची कंपनी ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’ कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. 2016 मध्ये मुकेश अंबानींनी रिलायन्स जिओ लॉन्च केल्यानंतर फ्री डेटा आणि फ्री कॉल ऑफर केल्यामुळे प्राइस वॉर सुरू झाली होती, याचा फटका अनिल अंबानी यांच्या कंपनीला बसला.
जर तुम्ही रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, शेअरची अवस्था खूपच खराब झाली आहे. 2 नोव्हेंबर 2007 रोजी या कंपनीचे शेअर्स 786 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते आता 24 फेब्रुवारी 2023 रोजी 1.75 रुपये किमतीवर आले आहेत. ज्या लोकांनी 2007 मध्ये या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 200 रुपयांवर आले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.