
Reliance Home Finance Share Price | रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. अनिल अंबानीं यांच्या मालकीच्या रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा खरेदी सुरू झाली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 3.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रिलायन्स होम फायनान्स कंपनी अंश )
9 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.22 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 17 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.61 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे शेअर्स 4.11 टक्के वाढीसह 3.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
6 वर्षांपूर्वी रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे शेअर्स 110 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिलायन्स होम फायनान्स ही कंपनी रिलायन्स कॅपिटलची उपकंपनी आहे. मार्च 2024 तिमाहीपर्यंत प्रवर्तकांनी रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे 0.74 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
अनिल अंबानी यांच्याकडे रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे 273891 शेअर्स आहेत. तर त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांच्याकडे कंपनीचे 2,63,474 शेअर्स आहेत. त्यांचा मुलगा जय अनमोल अंबानीकडे 28,487 शेअर्स आहेत. रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे 99.26 टक्के शेअर्स सार्वजनिक गुंतवणूकदारांनी धारण केले आहे.
नुकताच रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात बदल करण्यात आला आहे. 15 एप्रिल 2024 रोजी पार पडलेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गोपाल रामरत्नम, रविशेखर पांडे आणि हीना जयसिंघानिया यांच्या स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. डिसेंबर 2023 रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या महसूल संकलनात 99.89 टक्के घसरण झाली आहे. या कंपनीचा नफा देखील एका वर्षभरात 98.97 टक्के कमी झाला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.