
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. फक्त दोन ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 35.98 टक्क्यांनी कमजोर झाले होते. रिलायन्स इन्फ्राची उपकंपनी असलेल्या दिल्ली एअरपोर्ट मेट्रो एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 8,000 कोटी रुपयेचा फटका बसला आहे. ( रिलायन्स इन्फ्रा कंपनी अंश )
रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या उपकंपनी संबंधित एका प्रकरणात लवादाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे रिलायन्स इन्फ्रा स्टॉक मंदीच्या गर्तेत अडकला आहे. शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 12.96 टक्के घससणीसह 198.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शुक्रवारी 20 टक्क्यांच्या घसरणीसह 181.95 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील दोन दिवसांत या कंपनीचे शेअर्स 35.98 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. रिलायन्स इन्फ्राची उपकंपनी दिल्ली एअरपोर्ट मेट्रो एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेडला दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला सुमारे 8,000 कोटी रुपये द्यावे लागणार आहे.
रिलायन्स इन्फ्रा कंपनीने सेबीला माहिती दिली की, “सर्वोच्च न्यालयाने दिलेल्या निर्णयाचा रिलायन्स इन्फ्रा कंपनीवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने DMRC द्वारे DAMEPL विरुद्ध दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेला परवानगी दिली आहे. रिलायन्स इन्फ्रावर SC ने दिलेल्या आदेशाचा कोणताही परिणाम होत नाही. लवादाच्या निवाड्याअंतर्गत DMRC/DAMEPL कडून रिलायन्स इन्फ्रा कंपनीला कोणतेही पैसे मिळालेले नाहीत, म्हणून ते देण्यासाठी रिलायन्स इन्फ्रा कंपनी बांधील नाही”.
बीएसई आणि एनएसईने रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स ASM अंतर्गत निरीक्षणाखाली ठेवले आहेत. तज्ञांच्या मते, दैनिक चार्टवर रिलायन्स इन्फ्रा स्टॉक घसरणीचे संकेत देत आहे. या स्टॉकमध्ये 182 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर उच्च पातळीवर स्टॉकमध्ये 210-230 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळू शकतो. तज्ञांच्या मते, रिलायन्स इन्फ्रा स्टॉक पुढील काळात 161 रुपये किमतीपर्यंत घसरू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.