 
						Reliance Share Price | गुरुवारी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर (NSE: RELIANCE) तेजीत होता. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1.35 टक्के वाढून 1,268.95 रुपयांवर पोहोचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
निफ्टी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर
मागील काही दिवस निफ्टीच्या घसरणीत सर्वात मोठा वाटा मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा आहे. फ्री बोनस शेअर्स वाटपानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा शेअर ११ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. 18 डिसेंबर 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरचा भाव 1260 रुपये होता.
आज रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा शेअर 1,253.60 रुपयांवर खुला झाला. गुरुवारी दिवसभरात शेअरचा उच्चांक 1,270.50 रुपये होता, तर निच्चांकी पातळी 1,251.10 रुपये होती. गुरुवारी हा शेअर 1.55 टक्क्यांनी वाढून 1,271.40 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, सीएलएसए ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.
सीएलएसए ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
सीएलएसए ब्रोकरेज फर्मच्या मते, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर त्याच्या कंझर्व्हेटिव्ह प्राईसच्या 5% च्या आत आहे. 2025 ट्रिगरसह 30% ‘अपसाईड’ दिसत आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचा लवकरच लाँच होणारा सोलर पीव्ही गिगाफॅक्टरी हा एक ट्रिगर आहे, ज्याकडे शेअर बाजार दुर्लक्ष करत आहे.
शेअरची टार्गेट प्राईस
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा सौर व्यवसाय ३० अब्ज डॉलरचा असून एकूण नवीन ऊर्जेचा व्यवसाय ४३ अब्ज डॉलरचा आहे. याची भरपाई २-७ टक्क्यांनी कमी करून २५-२७ EPS करण्यात आली आणि रिटेलसाठी आमचे मूल्य कमी झाले. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 1650 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील १ महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 7.47% घसरला आहे. मागील ६ महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 10.57% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 7.79% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 74.32% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 4,690.46% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर या शेअरमध्ये 1.94% घसरण झाली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		