
Reliance Share Price | गेल्या वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर 8.41 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. या घसरणीनंतर गोल्डमन सॅक्स या ग्लोबल ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची नुकतीच झालेली विक्री ‘ओव्हरडोनर’ झाली आहे. आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची किंमत ‘बेअर केस’ मूल्यांकनाच्या जवळपास पोहोचली आहे.
गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मने शेअर टार्गेट प्राईस घटवली
त्यामुळे गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरवर ‘बाय’ रेटिंग कायम ठेवताना टार्गेट प्राईस घटवून 1,595 रुपये केली आहे. याचा अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर सध्याच्या पातळीपेक्षा 26 टक्क्यांनी वाढू शकतो. गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरसाठी १,६३० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत ब्रोकरेज बुलिश
गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज सहित आठवडाभरात जारी करण्यात आलेले रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी’संबंधित ही चौथी सकारात्मक ब्रोकरेज नोट आहे. यापूर्वी बर्नस्टीन आणि जेफरीज ब्रोकरेज फर्मने आकर्षक मूल्यांकनाचा हवाला देत रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी बद्दल आपल्या नोटमध्ये सकारात्मक संकेत दिले होते.
गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मने काय म्हटले?
दरम्यान, गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मने पुढे म्हटले आहे की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा आर्थिक वर्ष 2026 EBITDA वार्षिक 24 टक्क्यांनी वाढेल, आर्थिक वर्ष 2025 मध्ये रिफायनिंग क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी क्षमता वाढवणे, रिटेल विक्रीला चालना देणारी व्यापक आर्थिक सुधारणा आणि ऊर्जा क्षेत्रातील प्रगती यासारख्या अनुकूल गतिशीलतेमुळे कंपनीला फायदा होईल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.