
Retina Paints IPO | ‘रेटीना पेन्ट्स’ कंपनीचा IPO 19 एप्रिल 2023 रोजी शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. 24 एप्रिल 2023 रोजी या IPO ची अंतिम मुदत संपली. ‘रेटिना पेंट्स’ कंपनीचा IPO 2.31 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. यापैकी किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 2.22 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. शेअर बाजार तज्ञांचा मते, रेटिना पेंट्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 4 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते रेटिना पेंट्स कंपनीचे शेअर्स प्रीमियम किमतीवर ट्रेड होऊ शकतात. (Retina Paints Limited)
रेटिना पेंट्स GMP तपशील :
शेअर बाजार तज्ञांच्या मते रेटिना पेंट्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 4 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. ग्रे मार्केटच्या किंमत नुसार रेटिना पेंट्स कंपनीचे शेअर्स 34 रुपये किमतीवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. या कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 30 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती. जर हा IPO स्टॉक ग्रे मार्केट मध्ये प्रीमियम किमतीवर टिकला तर शेअरची लिस्टिंग प्रॉफिटसह होऊ शकते.
रेटिना पेंट्स आयपीओ तपशील :
रेटिना पेंट्स कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. रेटिना पेंट्स आयपीओ सबस्क्रिप्शन स्टेटसनुसार कंपनीचा आयपीओ 2.31 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 2.31 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर उर्वरित राखीव कोटा 2.34 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.