
RO Jewels Share Price | आरओ ज्वेल्स कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली होती. आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीच्या निकालांची घोषणा केल्यानंतर या स्मॉल कॅप पेनी स्टॉकमध्ये देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला सुरुवात केली. (RO Jewels Share Price Today)
मॉरिशसस्थित परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार, विकास इंडिया ईआयएफआय फंडने 10 रुपयेपेक्षा स्वस्त असलेल्या आरओ ज्वेल्स कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 19 जून 2023 रोजी FII ने आरओ ज्वेल्स कंपनीचे 2.80 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी आरओ ज्वेल्स कंपनीचे शेअर्स 2.15 टक्के वाढीसह 7.13 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आरओ ज्वेल्स कंपनीमध्ये FII ने 7 रुपये प्रति शेअर या किमतीवर गुंतवणूक केली आहे. याचा अर्थ मॉरिशसस्थित AMC ने 10 रुपये पेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड करणाऱ्या आरओ ज्वेल्स कंपनीमध्ये 19.60 लाख रुपये गुंतवणूक केली आहे. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी देखील आरओ ज्वेल्स कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत.
BSE वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार , चेन्नईस्थित DII Commendum Investments Pvt Ltd ने आरओ ज्वेल्स कंपनीचे शेअर्स 6.98 रुपये किमतीवर खरेदी केले आहेत. त्यांनी इतक्या स्वस्त किमतीवर तब्बल 3,12,988 शेअर्स खरेदी केले आहेत.
DII Commendum Investments Pvt Ltd ने आरओ ज्वेल्स कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 21,84,656.24 रुपये खर्च केले आहेत. शेअरमधील मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या खरेदीची बातमी पसरताच लोकांनी ऑर्डर प्लेस करायला सुरुवात केली, आणि शेअरची किंमत वाढू लागली. RO Jewels कंपनीच्या शेअरने आज 7.13 रुपये किंमत स्पर्श केली आहे. स्टॉकमध्ये तेजी आल्यानंतर किंचित प्रॉफिट बुकींग देखील पाहायला मिळाली होती, मात्र नंतर स्टॉक त्यातून सावरला.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.