
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. सलग पाच दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. शनिवारी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. मागील 5 दिवसांत या कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांनी मजबूत झाले होते. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल स्टॉक 83 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 345.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 110.50 रुपये होती. शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 6.90 टक्के वाढीसह 299.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
मागील 4 वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1660 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 29 मे 2020 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 18 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 301.75 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 3 वर्षांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 925 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 14 मे 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 29.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 2 वर्षात रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 843 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 158 टक्के परतावा कमावून दिला आहे. 19 मे 2023 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 116.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 18 मे 2024 रोजी हा स्टॉक 300 रुपयेच्या पुढे गेला होता. 2024 या वर्षात आरव्हीएनएल स्टॉक 65 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 182.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मे महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने 300 रुपये किंमत स्पर्श केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.