
Sadhana Nitro Chem Share Price | साधना नायट्रो केम लिमिटेड कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने मंगळवार दिनांक 27 जून हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारी साधना नायट्रो केम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 133.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील दिवसाच्या तुलनेत या कंपनीच्या शेअरमध्ये 1.07 टक्के पडझड पाहायला मिळाली होती. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी साधना नायट्रो केम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.60 टक्के घसरणीसह 132.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बोनस शेअर तपशील
साधना नायट्रो केम लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक 9 इक्विटी शेअर्सवर 2 बोनस इक्विटी शेअर्स मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक 9 शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. यासोबतच कंपनीने दर्शनी किमतीवर 15 टक्के म्हणजेच प्रति इक्विटी शेअरवर 0.15 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
तिमाही कामगिरी
मार्च 2023 तिमाहीत साधना नायट्रो केम लिमिटेड कंपनीने 50.46 कोटी रुपये विक्री नोंदवली होती. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत 37.38 टक्के वाढ झाली आहे. मार्च 2022 तिमाहीत 36.73 कोटी रुपये विक्रीसह कंपनीने 2.62 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. एका वर्षापूर्वीच्या कालावधीच्या तुकनेत कंपनीच्या नफ्यात 94.07 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी साधना नायट्रो केम लिमिटेड कंपनीने 1.35 कोटी रुपये नफा कमावला होता. तर कंपनीचा EBITDA 10.87 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कंपनीच्या EBITDA 113.14 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.