
SBI Investment | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक तुम्हाला अशी संधी देत आहे, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. खास गोष्ट म्हणजे एसबीआयच्या या योजनेत तुम्हाला दरमहा केवळ 1 हजार रुपयांची गुंतवणूक करून 1 लाख 59 हजार रुपयांचा परतावा मिळू शकतो. जाणून घेऊया या योजनेविषयी.
एसबीआय आरडीवर चांगले व्याज देते :
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना चांगले व्याजदर देते. एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट Sbi.co.in दिलेल्या माहितीनुसार, एसबीआय आपल्या आरडी स्कीमवर वार्षिक 5.3 टक्के दराने 3-5 वर्षांसाठी व्याज देत आहे. इतकंच नाही तर तुमची आरडी स्कीम 5 वर्षांपेक्षा जास्त जुनी असेल तर एसबीआय तुम्हाला 5.4% दराने व्याज देईल.
एसबीआय आरडीवर दंडाचे नियम :
तुम्ही आरडी घेतली असेल आणि वेळेवर पैसे देत नसाल तर एसबीआय दंडही आकारते. ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या आरडींवर प्रति १०० रुपये १.५ रुपये दंड आकारण्यात येणार आहे. ५ वर्षांवरील आरडींवर प्रति १०० रुपये २ रुपये आकारले जातील. म्हणजेच 1000 रुपयांचे 20 रुपये. जर 6 महिने सतत पैसे जमा झाले नाहीत तर एसबीआय ती स्कीम बंद करून सर्व पैसे तुमच्या बचत खात्यात पाठवेल.
एसबीआय आरडी सेवा शुल्क :
sbi.co.in दिलेल्या माहितीनुसार, ३-४ वेळा वेळेवर पैसे जमा झाले नाहीत तर बँक १० रुपये वसूल करेल. जे सेवा शुल्क म्हणून घेतले जाईल.
१.५९ लाख रुपयांचा परतावा कसा मिळेल :
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सांगितले की, जर तुमचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुम्ही दरमहा १,००० रुपये ते १२० महिन्यांपर्यंत ठेवत असाल तर तुम्हाला १० वर्षांत ५.४ टक्के दराने १.५९ लाख १५५ रुपये मिळतील.
ज्येष्ठ नागरिकांना अधिक लाभ :
एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने आरडी योजनेत गुंतवणूक केल्यास बँक त्यांना .८० टक्के जादा व्याजदर देते. म्हणजेच एसबीआय ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षांपेक्षा जास्त आरडीवर 6.2 टक्के दराने व्याज देणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.